सोनालिका तर्फे टायगर इलेक्ट्रिक हा भारतातील पहिला फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल


पुणे- भारतासह युरोप, अमेरिका, आफ्रिकेसह १३० देशांमध्ये अव्वल ट्रॅक्टर ब्रँड म्हणून ओळखल्या सोनालिका तर्फे टायगर इलेक्ट्रिक हा भारतातील पहिला फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल करण्यात आला आहे.   शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाधारित उत्पादनाचे डिझाईन युरोपमध्ये करण्यात आले आहे.

भारतासह जगभरातील शेतकऱ्यांसाठी आवाजविरहित शेती, शून्य कार्बन फूटप्रिंट (प्रदुषण), सहजरित्या घरी चार्जिंग करता येईल आणि शक्तीशाली असा ट्रॅक्टर जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आला असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करणायत आला आहे.  तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे ठरेल असे उत्पादन देत जगभरातील शेतीचे आधुनिकीकरण करण्यामध्ये सोनालिकाने पुढाकार घेतला आहे. जगासाठी बनविलेल्या आणि भारतात बनविलेल्या म्हणजेच मेक-इन-इंडियाचे हे उत्तम उदाहरण आहे.

अधिक वाचा  देशभरात उभारणार १ हजार क्रीडा निपुणता केंद्रे – किरेन रिजिजू

ट्रॅक्टर उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या आधारे नवीन टप्पा निर्माण करणाऱ्या भारतातील पहिल्या फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सोनालिका टायगर इलेक्ट्रिकमध्ये अत्याधुनिक अशी आयपी६७ अनुसार बनविलेले २५.५ किलोवॅटची नैसर्गिक कुलिंग देणारी काॅम्पॅक्ट बॅटरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक डिझेलच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश इंधन खर्च होणार आहे. घरामध्ये असलेल्या नेहमीच्या चार्जिंग पाॅईंटवरून दहा तासात पूर्णपणे चार्ज होणारी ही उच्च दर्जाची नावीन्यपूर्ण बॅटरी टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये बसविण्यात आली आहे. त्यामुळे इंधन भरण्यासाठी वारंवार पेट्रोल पंपावर जाण्याची गरज शेतकऱ्यांना यापुढे भासणार नाही. टायगर इलेक्ट्रिकची उर्जा बचत करणारी इट्रॅक मोटर सर्वोत्तम परफाॅर्मन्स देण्यासाठी शून्य आरपीएम ड्राॅपसह सर्वाधिक पाॅवर डेन्सिटी आणि पीक टाॅर्क देते. त्यामुळे कितीही लोड असला तरी सर्वात जलद पिक-अपकरिता ट्रॅक्टरला लागणारी पाॅवर १०० टक्के वेळा आणि १०० टक्के टाॅर्कची उपलब्धतता ही या जर्मन डिझाईनच्या मोटारीमुळे मिळते. हा अत्याधुनिक ट्रॅक्टर बुकिंगसाठी उपलब्ध असून सुरवातीची आॅफर म्हणून त्याची किंमत ५.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love