‘प्रॉपटायगर डॉट कॉम’ तर्फे ‘राईट टू होम’ गृह प्रदर्शन


पुणे-  प्रॉपटायगर डॉट कॉम या ऑनलाईन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनीने पुण्यासह देशभरामध्ये होणाऱ्या ‘राईट टू होम’ या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारी ६ आणि ७, २०२१ रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन पुण्यातील हिंजवडीतील विवांता येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत केले जाणार आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या व प्रामुख्याने प्रत्येकी ३० लाख ते १ कोटी रुपये किंमत असलेल्या एकूण ४४८५ सदनिकांची माहिती ग्राहकांना दिली जाणार आहे.

प्रदर्शनाच्या लाँचविषयी बोलताना प्रॉपटायगर डॉट कॉमचे बिझिनेस हेड  राजन सूद,  म्हणाले, कर्जांवरील सर्वात कमी व्याजदर, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात एक वर्ष मुदतवाढ देण्यात आलेले कलम ८०ईईए (गृहकर्जावर भरलेल्या व्याजातून मिळणारी सूट) यामुळे निवासी सदनिकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी २०२१ हे वर्ष ही एक चांगली संधी आहे. हे पैलू लक्षात घेता आणि खरेदीसंदर्भात ग्राहकांकडून होणाऱ्या सकारात्मक विचारांमुळे – जे नुकत्याच प्रकाशित झालेल्या कन्झ्युमर सेंटिमेंट सर्व्हेमध्ये दिसून आले – आम्ही राईट टू होम या प्रदर्शनाची दुसरी आवृत्ती यंदा लाँच करत आहोत. यामध्ये पुणे शहराचाही समावेश करण्यात आला असून गृहखरेदीदारांना आघाडीच्या बिल्डर-विकसकांकडून भरघोस सवलती मिळविण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. आर्थिक आणि कायदेशीरदृष्टीने क्लिष्ट असणाऱ्या गृहखरेदीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे प्राॅपर्टी एक्सपर्ट ग्राहकांना सर्वतोपरी मदत करणार आहेत.

अधिक वाचा  अर्थसंकल्पातून रोजगारनिर्मितीला चालना:बांधकामासह विविध क्षेत्रांतून अनुकूल प्रतिक्रिया

पुण्यातील गृहनिर्माण क्षेत्रातील आघाडीचे विकसक हे या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन त्यांच्या प्रकल्पांची माहिती ग्राहकांना देणार आहेत. पूर्वांकार, शापूरजी पॅलॉनजी, कोहीनूर, गोयल गंगा, पुराणिक, एनबी भोंडवे आदी विकसकांचा त्यामध्ये समावेश आहे. परवडणाऱ्या घरांसह अलिशान घरांपर्यत अशा विविध प्रकारच्या सदनिकांची माहिती या प्रदर्शनामध्ये उपलब्ध होणार आहे. ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या या प्रदर्शनाच्या व्हर्च्युअल स्वरुपाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये ३० विकसकांनी व १२००० ग्राहकांनी सहभाग घेतला होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love