ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरण : येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांना अटक

Dr. Sanjay Marsale Arrested in Lalit Patil Drug Case
Dr. Sanjay Marsale Arrested in Lalit Patil Drug Case

Lalit Patil Drug Case —ड्रग्ज तस्कर ( Drug trafficker) ललित पाटील (Lalit Patil) यास ससून रुग्णालयात (sasoon Hospital) दाखल करण्याची शिफारस करणारे येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे (Yerwada Central Jail) डॉ. संजय मरसाळे (Dr. Sanjay Marsale) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 

ललित पाटील (Lalit Patil) हा पुण्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना त्याने आजारी असल्याचा बहाणा केला व त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटील याने ससून रुग्णालयातून नाशिक येथे ड्रग निर्मिती कारखान्यासोबत ड्रग रॅकेट (Drug Racket) सक्रिय केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात येरवडा मध्यवर्ती कारागृहातून ललित पाटील यास आर्थिक जोरावर ससून रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस देणारे पत्र डॉ. संजय मरसाळे (Dr. Sanjay Marsale) यांनी दिले असल्याचे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर मरसाळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. डॉमरसाळे (Dr. Marsale) याने बलकवडे याला व्हॉट्स ॲप व मोबाईलवर कॉल करून ललित पाटीलला ससून रुग्णालयात उपचार मिळावेत आणि त्याला तेथून पळून जाणे सोयीचे व्हावे यासाठी मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ललितचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी त्याला मदत केल्याच्या आरोपावरून डॉमरसाळे याला अटक करण्यात आली आहे. 

अधिक वाचा  #हीट अँड रन प्रकरण : ‘ब्लड सॅम्पल’मध्ये फेरफार करण्यासाठी वडगाव शेरीतून आले ३ लाख रुपये : दोन डॉक्टरांसहित तिघांना ३० मे पर्यंत पोलिस कोठडी

ललित पाटील प्रकरणात आत्तापर्यंत पुणे पोलीस दलातील दहा पोलिसांचे निलंबन करण्यात आलेले आहे, तर दोन पोलिसांना अटकदेखील करण्यात आली. ललित पाटील यास ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवून पोलीस कर्मचारी यांना अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ससून रुग्णालयातील जेल गार्ड मोईस शेख यालादेखील पोलिसांनी अटक केलेली आहे. ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक 16 मधून पळून जाण्यास ललित पाटील यास शेख यांनीदेखील सहाय्य केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले होते. येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांनी आर्थिक जोरावर नेमके कोणकोणत्या गुन्हेगारांना ससून रुग्णालयात दाखल होण्यासाठीचे शिफारस पत्र दिले आहे. याबाबतदेखील पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे, त्यासोबत नेमके पैसे कशाप्रकारे स्वीकारले आणि त्याचा व्हिडिओ कशाप्रकारे केला गेला, याबाबतदेखील तपास करण्यात येत आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love