आचंद्र सुर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -स्वराज्याचे बलस्थानं असणार्या गडकोटांवर दिपोत्सव साजरा करूनच घरी दिवाळी साजरी करणाऱ्या  सरहद आणि गडझुंजार मावळे प्रतिष्ठानने सर्व गडांवर दिपोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांनी रयतेला  स्वराज्याचा प्रकाश बहाल केला मात्र तेच गडकोट ऐन दिवाळीत अंधारात बुडालेले असतात. तो अंधार नष्ट करण्यासाठी आणि त्या अभेद्य गडकोटांना नतमस्तक होण्यासाठी सरहद आणि गडझुंजार मावळे प्रतिष्ठानने राजगडावर  दिपोत्सव सुरू केला. हाच उपक्रम आज वैचारिक प्रदूषण नष्ट करणारा सोहळा ठरतोय.

सरहदचे संजय नहार, शैलेश वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर मसूरकर यांनी गडझुंजार मावळे प्रतिष्ठानच्या सहकार्याने अकरा वर्षापुर्वी सुरू केलेल्या या दिपोत्सवाची व्याप्ती वाढते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे  तब्बल पंचवीस वर्षे वास्तव्य असलेला राजगड शिवविचारांचे एक शक्तीस्थळ आहे. दिपावलीचा पहिला दिवा राजगडावर आणि नंतरच आपल्या घरात दिवाळी साजरी करण्याचा संकल्प सर्व शिवप्रेमींना भावतो आहे.

राजगडावरील पद्मावती मंदीरासह, सईबाईंचे समाधीस्थळ, पाली दरवाजाची हारफुलांनी सजावट. जागरण गोंधळ, मध्यरात्री माता पद्मावतीचे पूजन, महाआरती, पहाटे काकड आरती. पद्मावती मंदीर ते पाली दरवाज्या पर्यंत  महाराजांच्या प्रतीमेचा  पालखी सोहळा पार पडतो. यावर्षी तर शिवकालीन मर्दानी खेळांनी वातावरण शिवमय झाले होते. अविचारांनी काळवंडलेल्या वातावरणाला शुध्द करण्याची गरज ओळखून वैचारिक प्रदूषण रोखण्याच्या निर्धार शिवप्रेमींना केला. वैचारिक भेदामूळे देशाच्या स्वातंत्र्याला धोका पोचू नये यासाठी आचंद्र सुर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हा विचार मनामनात रूजवण्याचा संकल्प हाती घेण्यात आला.

या सोहळ्यासाठी सरहद्द संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, मा. सचिन कोळी, मा.चंद्रकांत दादा मांगडे, मा. राजेंद्र फरांदे, मा. एडवोकेट प्रशांत साळुंखे, मा. शंकर शेठ कडू, मा. राहुल नलावडे, छावा प्रतिष्ठान चे विनोद भुजबळ, मा. शेखर शिंदे, हे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. प्रीतम मिसाळ यांनी केले. प्रस्तावना मा. मयूर मसुरकर यांनी केले तर आभार मा. ओम कदम यांनी मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *