महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते- रूपाली चाकणकर

The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents
The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents

पुणे : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ज्या प्रकारचे वक्तव्य केले आहे त्याबद्दल त्यांनी महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते, याची जाणीव ठेवावी असा इशारा राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रवीण दरेकरांनी या मेळाव्याला हजेरी लावली होती. प्रवीण दरेकरांनी यावेळी बोलताना सुरेखा पुणेकरांचे नाव न घेता टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, असा टोला लगावला. गरीबांकडे पाहण्यासाठी या पक्षाला वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष असल्याची टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती. त्यावरून रुपाली चाकणकर यांनी वरील इशारा दिला आहे. महिलांचा अपमान करणाऱ्यांना योग्य शासन द्या, असा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

अधिक वाचा  गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी -देवेंद्र फडणवीस

प्रवीण दरेकरांना रुपाली चाकणकर यांनी खडे बोल सुनावले आहेत. आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येते. हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांच्या कैवारी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, आज मला त्यांची कीव येते. त्या अशा पक्षात काम करत आहात, ज्यांच्या पक्षाचा हा विचार आहे. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे, ती दिसून आली. ज्या प्रकारचे वक्तव्य प्रवीण दरेकर तुम्ही केले त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते, याची जाणीव ठेवावी असे चाकणकर म्हणाल्या.

प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना टीका केली. पण त्या टीकेची पातळी खालच्या दर्जाची होती. त्यांनी आक्षेपार्ह्य भाषा वापरलेली असल्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाला आहे, त्यांना चांगलीच शिक्षा देऊ, असा पलटवार राष्ट्रवादीने केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love