कोरोना व्हायरसमुळे जगाची रूपरेषा बदलणार आहे हे मात्र नक्की. जगाची रूपरेषा बदलत असताना शिक्षण पद्धतीमध्ये पण अमुलाग्र बदल होणार आहेत. आजपर्यंत आपले हे युग डिजिटल युग म्हणून (संबोधले जायचे ) पुढे वाटचाल करत होते पण खरंच हे युग डिजिटल होते का? असा कोणी प्रश्न विचारला तर नाही असेच उत्तर द्यावे लागेल.
कारण की आत्ता पर्यंत शाळा, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय या सर्व शिक्षण विभागात डिजिटल माध्यमांचा उपयोग एका ठराविक गोष्टीनं पुरताच मर्यादित होता म्हणजे डिजिटल माध्यमाचा उपयोग फक्त कार्यालयीन कामकाज करण्यासाठी व्हायचा, विद्यार्थ्यांची आणि शिक्षकाची माहिती, विद्यार्थ्याचे मार्क्स साठवून ठेवण्यासाठी व्हायचा. आजपर्यंत विद्यार्थी शाळा, कॉलेजेस मध्ये पाठ्यपुस्तक घेऊन येत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्वीप्रमाणे जुन्याच पद्धतीने शिकवले जायचे, त्यांना हाताने लिहूनच परीक्षा द्यावी लागत होती. काही ऑनलाईन स्पर्धापरीक्षा सोडल्या तर प्रत्येक ठिकाणी त्यांना कागद आणि पेनचा वापर करावा लागत आहे. करोना व्हायरसमुळे ही जुनी शिक्षणाची पद्धत आपल्याला बंद करावी लागणार आहे हे मात्र खरं आहे. कोरोना व्हायरसमुळे काही लोकांनी न्यूजपेपर घेणे बंद केले, काही न्यूजपेपर कंपनीने तर न्यूजपेपरचे ऑनलाईन सबस्क्रिप्शन चालू केले आहे. ऑनलाईन माध्यमातूनच त्याचा न्यूजपेपर लोकांपर्यंत पोहचत आहे.
कोरोनी व्हायरसमुळे लोकांना संपर्क कमी झाला आहे आणि हाच सिद्धांत ते पुढे आपल्या मुलांसाठी अवलंबणार आहेत, त्यासाठी डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करावा लागणार आहे.
लोकांचे राहणीमान असेल, शिक्षण असेल प्रत्येक गोष्टींमध्ये मनुष्याने काळानरुप बदल केले आहेत आणि त्याला बदल करावे लागत आहेत. असाच बदल त्याला शिक्षणपद्धती कोरोनीचा वाढता धोका पाहता करावा लागणार आहे.
नवीन शिक्षण पद्धतीमध्ये डिजिटल माध्यमांचा वापर जास्तीत जास्त करावा लागणार आहे. शिक्षणाची जुनी कागद आणि पेनसिल, पेन पद्धत त्याला बंद करावी लागणार आहे. शिक्षणामध्ये त्याला स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप यांचा वापर जास्त करावा लागणार आहे.
सगंणकमधील क्लाउड टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी त्याला नवीन नवीन सॉफ्टवेअर बनवावी लागणार आहेत. शिक्षण घेताना घेण्यात येणाऱ्या विद्यार्थ्याच्या परीक्षा असतील नाहीतर त्यांचे चेकिंग असेल हे सुद्धा त्याला डिजिटल माध्यमाच्या स्वरूपात घ्याव्या लागणार आहेत.
करोना व्हायरसचा प्रसार असाच वाढत राहिलांतर मुलाचे शिक्षण बंद करुन चालणार नाही. त्यासाठी त्याला शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करावाच लागणार आहे.
डिजिटल शिक्षण पद्धत जरी अवलंबणे म्हणावे तितके सोपे नाही, एखादी नवीन गोष्ट स्विकारताना चांगल्या आणि वाईट असे दोन्ही गोष्टींना सामोरे जावे लागते तसेच बऱ्याच जणांकडून नवीन गोष्ट स्विकारताना विरोध होऊ शकतो.
डिजिटल शिक्षण पद्धतीचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्याचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे त्यामुळे बरेच पालकांना ही पद्धत आवडेल ही.
डिजिटल शिक्षण पद्धत स्विकारताना पुढील गोष्टीचा सामना करावा लागू शकतो
डिजिटल शिक्षणाचे प्रमुख दोन प्रकार पडतात
१) ऑफलाईन प्रकार
विद्यार्थाना सिम कार्ड विरीहित टॅब देता येऊ शकतो, या टॅब मध्ये इंटरनेट चालणार नाही तसेच शाळेमधील आता असणारी पुस्तके त्यांना डिजिटल रुपात त्यांना देता येऊ शकतात, तसेच डिजिटल पेणच्या माध्यमातून त्यांना होम वर्क दिली जाऊ शकतो. स्कूल मधील वायफायच्या वापर करून तो चेक करू शकतात.
मुलांना शिक्षणासाठी दिलेले हे टॅब इंटरनेटला कनेक्ट करता येणार नाही. त्यामुळे ते सोशल मीडियाच्या आहारी जाणार नाहीत. तसेच इंटरनेट नसल्यामुळे परीक्षांसाठी पण हा टॅब वापरला जाऊ शकतो. पेपरचे चेकिंग पण शिक्षकांना करता येऊ शकते.
२) ऑनलाईन प्रकार
ऑनलाईन प्रकारामध्ये टॅब हा ऑनलाईन साईटला कनेक्ट करता येऊ शकतो. विद्यार्थ्याचा डेटा क्लाउड चा वापर करून साठवून ठेवता येईल. ऑफलाईन मधील सर्व गोष्टी शाळा ऑनलाईन टॅब चा वापर करून करू शकते. ऑनलाईन टॅब चा एक फायदा म्हणजे सुट्टीच्या दिवशी पण विद्यार्थी शिक्षकानं बरोबर कनेक्ट राहू शकतील तसेच त्यांना होम वर्क विद्यार्थी शाळेत आले नाहीत तरी देऊ शकतील. ऑनलाईन टॅब मुळे विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर जास्त करतील त्यामुळे हे थोडे घातकच आहे. तसेच इंटरनेट शी कनेक्ट करण्यासाठी पालकाचा खर्च वाढू शकेल. टॅब इंटरनेट शी कनेक्ट होत असल्यामुळे व्हायरस येऊ शकतो तसेच हॅक पण होऊ शकतो.
१८ वर्षा खालील मुलांना सिम कार्ड विकत घेता येत नाही त्यामुळे हे टॅब सिम विरहित असतील. सरकारी शाळांमध्ये टॅबचा खर्च सरकार करू शकते पण खाजगी शाळांमधील टॅबचा खर्च हा पालकांनाच करावा लागणार आहे. पालकांचा पाठ्य पुस्तकांवर होणार खर्च वाचू शकतो त्यामुळे त्यांना थोडाफार दिलासा मिळेल.
करोना व्हायरसाचा प्रसार असाच वाढत राहिला तर डिजिटल शिक्षण पद्धत शाळांना आणि पालकांना गत्यंतर नाही कारण मुलाचे शिक्षण बंद पडायला नको.
सोमनाथ म्हमाणे.
८९७५७५०७८९