ढिसाळ आणि असंवेदनशील व्यवस्थेचा बळी : पांडुरंग रायकर


पुणे–पुण्यामध्ये अगदी गाजावाजा करून आणि सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून गेल्या आठ दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलच्या व्यवस्थापणाचा गलथान कारभार, प्रशासन आणि शासन  एकमेकातील विसंवाद आणि एकूणच प्रशासनाच्या असंवेदनशीलतेने  एका तरुण, उमद्या पत्रकाराचा बळी घेतला. टीव्ही९ या मराठी वाहिनीचे पुण्यात काम करणारा पत्रकार पांडुरंग रायकर हा या ढिसाळ आणि असंवेदनशील व्यवस्थेचे बळी ठरला. मोठा गाजावाजा झालेल्या या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी आवश्यक सुविधा नसल्याचेच भयानक वास्तव समोर आले आहे. इतकेच नाही तर रुग्णांना नातेवाईकांनी दिलेला जेवणाचा डबाही रुग्णांपर्यंत पोहोचत नसल्याने जम्बो कोविड सेंटरचा गलथान कारभार समोर आला आहे. रात्रभर सर्व पत्रकारांनी प्रयत्न करूनही एक कार्डियाक अॅम्ब्युलंस उपलब्ध न झाल्याने चालत्या बोलत्या  पांडुरंगने पहाटे शेवटचा श्वास घेतला.

अधिक वाचा  जम्बो कोविड सेंटरमधील कामकाजामध्ये होते आहे सुधारणा? काय केले बदल?

पांडुरंग कोरोना झाला होता. कोपरगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी गेला असताना तिथे अगोदर पैसे भरण्यास सांगितले. सार्वजन ओळखीचे म्हणून  त्याला पुण्यात आणण्यात आले. सुरुवातीला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये त्याला खाट उपलब्ध झाली नाही. शेवटी सर्वांनी प्रयत्न करून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्यवस्था झाली. परंतु, त्याठिकाणी नेण्यासाठी रात्रभर सर्व पातळ्यावर प्रयत्न   त्यांना दाखल करण्यात आलेल्या  सीओईपी येथील जम्बो कोविड सेंटरचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.  

जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मात्र, ऑक्सिजनची कमतरता भासत असलेल्या रायकर यांना या सेंटरमध्ये योग्य उपचार मिळाले नाही. भुकेले असलेल्या पांडुरंग यांच्यासाठी सकाळी कोविड सेंटरच्या गेटवर नातेवाईकांनी दिलेला डबा संध्याकाळपर्यंत त्यांच्याजवळ पोहोचू शकला नव्हता. तसेच त्यांना दिलेली औषधेही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही.कोविड सेंटरच्या रजिस्टरवर नोंदणी केलेला नंबर आणि रायकर यांच्या खाटावरील वेगळे होते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जेवण, औषधे पोहोचलीच नाहीत, असे पांडुरंग रायकर यांच्या बहिणीने सांगितले. इतका गलथान कारभार या सेंटरवर सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या सेंटरमध्ये कार्डीयाक रुग्णवाहीका उपलब्ध नाही. व्हेंटिलेटरही याठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे जम्बो सेंटर नक्की कशासाठी उभारले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love