व्हॅलेंटाईन डे स्पेशल:”नातिचरामी”

ब्लॉग
Spread the love

आज “व्हॅलेंटाईन वीक” सुरू झाला , खरं तर व्हॅलेंटाईन वगैरे आम्हा भारतीयांची संस्कृती नाहीच ,पण या वेस्टन लोकांचे कौतुक करायला हवे … प्रेम व्यक्त करायला असे निरनिराळे दिवस शोधुन काढतात …

एक लक्षात घ्यायला हवं त्यांच्यात आणि आपल्यात मुख्य फरक असेल तर तो व्यक्त होण्याचा ….पत्नीला सहजा सहजी चार चौघात हग करण्याची त्यांची संस्कृती पण, वडीलधाऱ्यांसमोर बायको पासुन अंतर राखण्याचे आमचे संस्कार ….आपल्या कडे स्त्री किंवा पुरुष कितीही आधुनिक म्हणता येईल असे झाले , पेहराव बदलला किंवा बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने वावरले तरी अजुनही चार चौघात व्यक्त व्हायला बिचकतातच …याला संस्कृती किंवा संस्कार काहीही म्हणा …. आम्ही असं सहज व्यक्त नाही होऊ शकत हे त्रिकालाबाधित सत्य आहे …मग ते नातं कुठलेही असो ..

ज्याला वेस्टर्न लोक व्हॅलेंटाईन म्हणतात त्याला आमच्या कडे ” नातिचरामी ” म्हणत आम्ही ह्या नात्याचा स्वीकार केलेला असतो … “धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी’….हे वचन लग्नात नवऱ्याने बायकोला द्यायचे असते. ….आपल्या धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ मानले जातात . यापैकी मोक्ष सोडता इतर तीनही ही दोघांची जबाबदारी असते … या कुठल्याही गोष्टीत अतिचार होऊ नये म्हणुन द्यायचं वचन म्हणजेच नातिचरामी (न+अतीचरामी)…

धर्मशास्त्र सांगते पत्नी म्हणजे एकच स्त्री जी अनेक रूपं  घेते … जीचा प्रवास लग्नात वधु पासुन सुरु होत ,  मग भार्या , गृहिणी आणि शेवटी सखी होते …या अशा या सुंदर नात्याला खरचं लाल गुलाबाची गरज आहे का ?

एक महत्वाचं, आमची नाती रोकठोक नसतात , त्याला वेग वेगळ्या इमोशन्सची झालर असते …. इमोशन्स नसतील तर तो  व्यवहार होतो आणि व्यवहार म्हटले की देणं घेणं  आलेच …म्हणुनच आमच्या नात्यात लाल गुलाबाचे स्थान फक्त फ्लॉवरपॉट पुरता असते ….

मुळात जर प्रेम असेल तर हे प्रेम परिस्थिती नुसार बदलायला नको  ,प्रेम हे व्यक्तीवर असते त्याच्या सौदर्य , संपत्ती किंवा इतर गोष्टी वर नसते  कारण  या गोष्टी कालांतराने नष्ट होणाऱ्या असतात …. व्यक्ती पश्चात राहणाऱ्याला प्रेमाला लाल गुलाबाची उणीव भासु शकेल ? 

मुळातच भारतीय स्त्री ही मल्टिटास्किंग करणारी आहे …घर , नोकरी , मुलं बाळं , नातेवाईक , आर्थिक विवंचना संसार अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या तिला कसलं आलंय गुलाबाचं कौतुक .. अंतु बर्वा म्हणतो ” दुष्काळ पडला तर भाषणे कसली देता , पोटाला तांदुळ द्या ” त्याच भाषेत आपली स्त्री म्हणेल ” प्रेम वाटतंय तर गुलाब कसले देताय , जरा कामाला हातभार लावा “

आमच्या कडे व्हॅलेंटाईनचा गुलाब दिल्याने प्रेम वाढतही नाही किंवा नाही दिलं म्हणुन कमीही होत नाही . साक्षात ब्रम्हदेवाने गाठी बांधुन काटेरी संसार करायला धाडलेल्या दोघांना कसलं आलंय त्या व्हॅलेंटाईनचं कौतुक ?

माजे रानी, माजे मोगा

तुजे दोळ्यांत सोधता ठाव !

तुज्या छातीर ठेवता माथा

फुलाभाशेन भाशेन हलकी दुखा

तुजे पायान रुपता काटा

माजे काळजाक लागता घाव !

अशा या उद्दात्त प्रेमाला चॉकलेट, टेडी किंवा गुलाबाची का गरज भासेल ?

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *