अक्षरभारत- अच्युत पालव यांच्या संकल्पनेतून भारतीय लिप्यांद्वारे राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना


अक्षरभारत- अच्युत पालव यांच्या संकल्पनेतून भारतीय लिप्यांद्वारे राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना

पुणे- भारताच्या ७४ व्या स्वतंत्र्यदिनानिमित्त सुलेखनकार अच्युत पालव यांच्या संकल्पनेमधून १५ ऑगस्ट २०२० रोजी १५ भारतीय लिप्या, १५ सुलेखनकार,१५ गायक असा सुरेल कलात्मक मेळ साधून राष्ट्रगीताला एका वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आळे असून राष्ट्रगीत  आदिनाथ हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आहे. अक्षरभारतहा संकल्प अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी व MIT School of Fine Arts and Applied Arts-MIT ADT (Art, Design and Technology) University, Vishwashanti Sangit Kala Academy यांच्या संयुक्त विद्यमाने साकार करण्यात आला आहे.

भारत हा शेतीप्रधान देश जसा आहे तसाच तो लिपीप्रधानसुद्धा आहे. या संकल्पनेतून भारतातील १५ लिप्या आणि १५ सुलेखनकार यांना सोबत घेऊन राष्ट्रगीतातील प्रत्येक ओळ प्रत्येक लिपीत मांडली आहे आणि यामुळे प्रत्येक भारतीयाला आपली लिपी राष्ट्रगीतात पाहता येणार आहे. भारतीय लिप्यांची सुंदरता राष्ट्रगीताद्वारे सर्व जगासमोर यावी असे पालव यांना वाटत होते. लॉकडाउनच्या काळात प्रत्येक सुलेखनकाराने आपले कौशल्य पणाला लावून काम केले आहे. बऱ्याच ठिकाणी शाई,कागद यांची टंचाई भासली. दुकाने उघडी नसल्याने अडथळे आले परंतु राष्ट्रगीताचा आदर आणि लिपीचा अभिमान मनामनात असल्याने हा संकल्प पूर्णत्वास नेता आला, असे पालव यांनी सांगितले.

अधिक वाचा  जास्त काढा पिणे यकृतासाठी हानिकारक? काय म्हणते आयुष मंत्रालय?

 _*सहभागी सुलेखनकार*_

देवनागरी – अच्युत पालव        

ओडिया – एस.के. मोहंती   

तेलुगु – नवाकांथ कारीडे                   

कन्नाडा – जी.व्ही. स्रीकुमार              

मल्यालम – नारायण भट्टाथीरी                    

गुजराथी – गोपाल पटेल        

उर्दु – महमुद अहमद शेख      

तामीळ – मनोज गोपीनाथ         

गुरूमुखी – प्रभसिमर कौर            

मोडी – केतकी गायधनी        

काश्मिरी – अन्वर लोलाबी      

बंगाली – हिरेन मित्रा           

आसामी – मनिषा नायक       

मैथिली – रूपाली ठोंबरे         

सिद्धम –  अवधुत विधाते

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love