स्वातंत्र्यदिनाची रिलायन्स जीओची नवीन ऑफर ; पाच महिने विनामूल्य डेटा व कॉलिंग


स्वातंत्र्यदिनाची रिलायन्स जीओची नवीन ऑफर ; पाच महिने विनामूल्य डेटा व कॉलिंग

मुंबई- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रिलायन्स जीओकडून ग्राहकांसाठी दरवर्षी नवीन ऑफर दिली जाते. त्यामुळ जिओ काय ऑफर देणार याच्या प्रतीक्षेत ग्राहक असतात. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रिलायन्स जीओच्या वतीने नवीन ऑफर आपल्या ग्राहकांसाठी जाहीर केली आहे. ज्याअंतर्गत कंपनीच्या ग्राहकांना पाच महिने विनामूल्य डेटा व कॉलिंग मिळणार आहे.

रिलायन्स जिओने ही भेट आपल्या JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट डिव्हाइसच्या ग्राहकांना यावेळी दिली आहे. JioFi ची किंमत १,९९९  रुपये असून  ते खरेदी करणार्‍यांना येत्या पाच महिन्यांसाठी विनामूल्य डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळेल. एकदा JioFi  अॅक्टीव्हेट झाल्यानंतर, ग्राहकांना कुठला तरी एक प्लान घ्यावा लागेल आणि त्यानंतर ते My Jio अ‍ॅपच्या सहाय्याने ग्राहक त्यांचा बॅलंस चेक करू शकतील.

अधिक वाचा  भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांची अमेरिकन व्यावसायिकाकडून फसवणूक : मुखर्जी यांचे संशोधन चोरून व्यावसायिक अमेरिकन विद्यापीठाशी करार करण्याच्या तयारीत

कंपनीकडे JioFi साठी तीन योजना आहेत ज्यावर ही ऑफर लागू होईल. यातील सर्वात स्वस्त प्लान 199 रुपयांचा आहे. या योजनेत 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 जीबी डेटा उपलब्ध आहे. तसेच, जिओला जिओच्या नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि इतर नेटवर्कवर 1000 मिनिटांचे कॉलिंग मिळतात. अन्य दोन योजनांची किंमत 249 आणि 349 रुपये आहे. तुम्हाला ९९ रुपयांची प्राईमरी मेंबरशिप वेगळी घ्यावी लागेल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love