खडकवासला धरणात बुडून दोघांचा मृत्यू


पुणे–खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला खडकामध्ये असलेल्या डोहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.  घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढले. .

विजय नागनाथ रोकडे (वय 24, रा. बराटे चाळ, वारजे) आणि रॉबीन (अंदाजे वय 20, पुर्ण नाव माहीत नाही, रा. रामनगर, वारजे) अशी मृत तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विजय आणि त्याचा मित्र रॉबीन हे काल दि.१  एप्रिल रोजी सकाळी घरातून गेले होते. आज सकाळी धरणाच्या भिंतीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना खडकावर कपडे व बूट दिसले. आजूबाजूला कोणी न दिसल्याने याबाबत त्यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, पोलीस हवालदार पंढरीनाथ कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल चेतन बराटे, गजानन चव्हाण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानुसार नांदेड सिटी अग्निशमन केंद्र प्रमुख सुजित पाटील यांच्यासह अभिषेक गोणे, ओंकार इंगवले, शुभम मिरगुंडे, शुभम माळी, किशोर काळभोर, योगेश मायनाळे, पंकज माळी व अक्षय काळे यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत. उत्तमनगर पोलीस ठाण्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी

अधिक वाचा  खडकवासला १०० टक्के भरले : धरणाच्या सांडव्यातून ११ हजार ९०० क्युसेक विसर्ग : नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा

धरण परिसरात खाजगी सरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. असे असताना धरणाच्या मागच्या बाजूला दरवाजांजवळ अनेक तरुण मासे पकडण्यासाठी, पोहण्यासाठी, मद्य प्राशन करण्यासाठी येत असतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या तरुणांना सुरक्षारक्षकांनी वेळीच हटकले असते तर ही दुर्घटना घडली नसती. अशा अनेक घटना सातत्याने घटत असल्याने धरण व परिसराच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love