अखेर उद्या लागणार बारावीचा निकाल : कसा बघणार निकाल?

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

पुणे – अखेर उद्या (मंगळवार) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा ही परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. बारावीच्या निकाल प्रक्रियेला गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बसला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. पण राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नव्हती.पाऊस आणि पुरामुळे काही शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांकडून निकाल प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितल्यामुळे अंतिम टप्प्यात असलेली निकालाची प्रक्रिया काहीशी लांबली होती.

यंदा राज्य शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा रद्द केली होती. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर सीआयएससीईने दहावी-बारावीचा आणि सीबीएसईने बारावीचा निकाल जाहीर केल्यामुळे राज्य मंडळ बारावीचा निकाल कधी जाहीर करणार याची विद्यार्थी-पालकांना प्रतीक्षा होती. राज्यातील महाविद्यालये-विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया बारावीच्या निकालानंतरच सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केल्यामुळे बारावीच्या निकालावर पदवी प्रवेशाची प्रक्रिया अवलंबून आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.

यंदा दहावीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना वेळेत निकाल पाहता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी एकापेक्षा अधिक लिंक उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

‘‘बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत शिक्षण विभागाकडून काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक लिंकवर बारावीचा निकाल पाहता येईल, याबाबत शिक्षण मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

कुठे पाहणार निकाल?

१. https://hscresult.11 thadmission.org.in

२. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

४. mahresult.nic.in. .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *