पुणे- कोरोनाच्या संकटामुळे अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. अशीच एक मनाला चटका लावणारी घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. एका कोरोनाबाधित ३५ वर्षीय महिलेने गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. या मुलींची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली. परंतु, कोरोनाशी झुंज देणाऱ्या आईचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
35 वर्षीय या महिलेच्या प्रसुतीची वेळ जवळ आली होती, त्यातच तिला 4 एप्रिलला त्रास होऊ लागला. तिला वायसीएम रुग्णालयात दाखल करताना ऑक्सिजन लेव्हल खालावली होती. त्यामुळे अँटीजेन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 एप्रिलला ऑपरेशन (सिझेरियन) करुन प्रसुती करण्यात आली आणि तिने जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला. पण त्यानंतर आईची प्रकृती खालावत गेली आणि आज सकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 24 तासाच्या आतच जुळ्या चिमुकल्यांच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं