पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक बंद


पुणे–मागील आठवडाभरापासून पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. विसर्ग करण्यात आलेले पाणी नदीपात्रातून मोठ्या प्रवाहात वाहत आहे त्यामुळे डेक्कन नदीपात्रातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भिडे पुलाला लागून पाणी आल्यामुळे ही वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत.

मागील आठवडाभरापासून पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. खडकवासला, वरसगाव, टेमघर आणि पानशेत या चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे या धरणातील पाण्याची आवक दोन टीएमसी इतकी वाढली आहे. त्यामुळे मंगळवारपासून खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने नदी पात्राला लागून असणारी वाहने जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढली जात आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  चित्रकलेतील त्रिमूर्तीचे शक्तीदर्शन : चित्रकार आदिती मालपाणीच्या कलाकृतीने  घातली  सर्वांना मोहिनी