पुण्यात तरुणीचा निर्घृण खून : हात, पाय, डोके धडापासून कापले : ओळख पटविण्यासोबत आरोपींचा शोध सुरू

दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे(प्रतिनिधी)- पुणे शहरातील मुळा-मुठा नदीपात्रात खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनमागे वॉटर प्रंट सोसायटीजवळ नदीपात्रात वाहून आलेला तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. अज्ञात आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने १८ ते ३० वयोगटातील या तरुणीचे डोके, हात, पाय धारदार हत्याराने कापून तिचा मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याचे समोर आले आहे. या तरुणीचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पोलिसांकडून तिची ओळख पटविण्याचे त सेच आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सध्या खडकवासला धरणातून नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदीत दुथडी भरुन वाहत आहे. परंतु पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग काहीसा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी होऊ लागल्यानंतर खराडी भागात बांधकाम ठिकाणावर काम करत असलेल्या काही मजुरांना नदीपात्रात एक संशयास्पद मृतदेह दिसून आला. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, अज्ञात इसमाने या तरुणीला ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या टाकले असण्याची शक्यता आहे. तिच्या शरीराचे धडापासून शिर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून कोणत्यातरी धारदार हत्याराने कापले असल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणी ही रंगाने सावळी असून तिच्या उजव्या काखेच्या खाली काळा व्रण असल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरि÷ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.

अधिक वाचा  अनिल कपूरचा यांच्या या चित्रपटाला झाली २४ वर्षे : या चित्रपटात केली होती त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनसोबत स्क्रीन स्पेस शेअर

याबाबत पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव म्हणाले, की धड नसलेला एका तरुणीचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे. ससून रुग्णालयात हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शववच्छेदन अहवालानंतर पोलिसांना अधिक माहिती मिळू शकेल. पुणे शहर व पुणे ग्रामीण परिसरात बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती पडताळून पाहिली जात आहे. सदर भागातील सीसीटीव्ही फुटेजचीदेखील पाहणी करण्यात येत आहे. महिलेची ओळख पटल्यानंतर तपास कामात अधिक गती प्राप्त होईल, असे सांगण्यात आले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love