भाजपाच्या त्या महिला नेत्यांना पॉर्नफिल्ममध्ये जास्त इंटरेस्ट : सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका

Those women leaders of BJP have more interest in porn films
Those women leaders of BJP have more interest in porn films

पुणे(प्रतिनिधि)–भाजपच्या अक्रस्ताळ्या महिला नेत्यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवला आहे. आणि आमच्या पक्षाच्या (शिवसेना उद्धव ठाकरे गट)  जाहिरातीत पॉर्न स्टार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. कोण पॉर्नस्टार आहे की नाही हे आम्हाला माहित नाही.  कारण आम्ही अशा प्रकारच्या फिल्म पाहत नाही. मात्र भाजपाच्या त्या महिला नेत्यांना यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल. त्यामुळे त्यांना या फिल्म मधल्या पात्रांचा परिचय आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना लगावला.

आदुबाळ नाईट लाईफ लिमिटेड प्रोडक्शनच्या जाहिरातीमधील पात्र पॉर्नस्टार आहे. पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार उद्धव ठाकरे करत आहेत. हा पॉर्नस्टार जाहिरातीमध्ये विचारतो की, ‘महिलांवरील अत्याचार कधी थांबणार?’ हाच पॉर्नस्टार लहान वयांच्या मुलींबरोबर अश्लिल चित्रण करतो.”

अधिक वाचा  पुणे जिल्ह्यात बरे होणा-या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण 92.35 टक्के

या पॉर्न स्टारचे एका अ‍ॅपवरती मुलींबरोबर घाणेरडे कृत्य करतानाचे व्हिडीओ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कुठली संस्कृती आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणाची? त्याच्या कंपनीचा आणि पॉर्नस्टारचा काय संबंध आहे?” असा प्रश्न उपस्थित करत चित्र वाघ यांनी टीका केली होती त्याला उत्तर देताना अंधारे यांनी वरील वक्तव्य केलं.

अंधारे म्हणाल्या, एखादा कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत असतो. त्यामध्ये तो वेगवेगळे सीन करत असतो. मात्र त्या कलाकाराच्या कलाकारीवर आक्षेपच घ्यायचा असेल तर मग नवनीत राणा यांची आधीची गाणी आणि आता त्यांना देण्यात आलेल्या उमेदवारीबाबत भाजप व त्यांच्या नेत्यांचे काय म्हणणे आहे?  असा प्रश्न अंधारेंनी उपस्थित केला.  चित्रा वाघ या महिलांच्या प्रश्नांवरती सोयीस्कर भूमिका घेताना दिसत आहेत. मणिपूरमध्ये झालेल्या घटनेवर त्या गप्प बसतात. प्रज्वल रेवण्णा आणि सोमय्या या भाजप नेत्याचे जे व्हिडीओ समोर आले आहेत, त्याबाबत चकार शब्दही काढत नाहीत, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.

अधिक वाचा  १९ वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन पुण्यनगरीत होणार

चित्रा वाघ या जाहिरातीमध्ये असलेल्या कलाकाराचा अर्धवट माहितीच्या आधारे बदनामी करत आहेत. तो कलाकार वेब सिरीजमधील कलाकार आहे. याप्रकारे त्यांची बदनामी होत असेल तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे, असा इशाराही अंधारे यांनी दिला आहे. तसेच अशा प्रकारचे आक्षेप घेण्यापूर्वी कंगना रानौत, मनोज तिवारी, नवनीत राणा यांच्याबाबत भाजपची काय भूमिका आहे, हे पहिले त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही अंधारेंनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love