Watching each of their videos makes me laugh and feel sad

तोंडाने म्हणायचं राम कृष्ण हरी.. आणि चतुर्थीला खायचं.. मटन करी.. : चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–मोठ्या ताई.. मोठ्या ताई किती… किती बोलणार.. अडीच वर्ष सरकारमध्ये होत्या काय केलं ? त्यामुळे करणी आणि कथनी मध्ये फरक असतो. ज्या वेळेला ते सत्तेत असतात त्या वेळेला सर्व विसरून जातात. विरोधात आल्यानंतर त्यांना सर्व आठवते, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुळेंवर केली. दरम्यान, तोंडाने म्हणायचं राम कृष्ण हरी.. आणि चतुर्थीला खायचं.. मटन करी.. त्यांचा एक एक व्हिडिओ बघून मला हसू ही येतं आणि वाईटही वाटतं असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला.

चित्रा वाघ बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला .त्या म्हणाल्या, सुप्रिया सुळे यांचीन  सध्याची धावपळ आणि मानसिक संतुलन ढासाळलेलं मी पाहतं आहे. यावरून मला फार हसू येतं की या त्याच मोठ्या ताई आहेत, असा टोला त्यांनी लगावला.  

गाडीमध्ये कोणाला तरी बसवायचं. लगेच त्याचा रिल्स काढायचा. तो लगेच इन्स्टाग्रामवर पोस्ट करायचा. त्याला कॅप्शन द्यायचं ताई.. माझ्या हक्काची.. हे हक्काचं काम त्यांनी केलेलं आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेच्या भाषणात नाव न घेता अप्रत्यक्ष शरद पवार यांना भटकत्या आत्म्याची उपमा दिली होती. याबाबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना छेडले असता त्या म्हणाल्या की, साहेबांनी का जीवाला लागून घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर कुणाचाही नाव घेतलं नाही. ज्याने त्याने आपापल्या अंगाला लावून घेतलं तर त्याला आम्ही काय करणार. नाव न घेताच आम्हालाच बोलले असं म्हणण चुकीचं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, संजय राऊतांचे काय ऐकता. ते सर्व ज्ञानी आहेत. ते काँग्रेसच्या फडावर तुणतुण घेऊन नाचायचं काम करतात. लोकांना फसवून आर्थिक घोटाळ्यामध्ये जामिनावर सुटलेला आरोपी आहे.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून पवारांची सूनचं लोकसभेत जाणार असा विश्वास व्यक्त करताना वाघ म्हणाल्या की, या वेळच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत  बदल होईल. त्यामुळे पवार साहेबांची सून नक्की दिल्लीला जाईल. पवार साहेबांनी सुनेबाबत केलेले वक्तव्य धक्कादायक आहे. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्यांकडून अशी वक्तव्य धक्कादायक आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *