यंदाचा सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार अर्णवाझ दमानिया यांना जाहीर : सिस्टर लुसी कुरियन,कोमल वागसकर,स्नेहल व देवानंद लोंढे यांनाही पुरस्कार जाहीर : 29 ऑगस्टला होणार पुरस्कार वितरण

यंदाचा सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार अर्णवाझ दमानिया यांना जाहीर
यंदाचा सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार अर्णवाझ दमानिया यांना जाहीर

पुणे : आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ समाजसेविका, माजी राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू आणि कनेक्टिंग या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अर्णवाझ दमानिया यांना सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबरोबरच ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा सुहाना कमल सेवा सन्मान ज्येष्ठ समाजसेविका आणि माहेर आश्रमच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन, सुहाना कमल उद्यम सन्मान आर्टेमिस टेक प्रा. लिमिटेडच्या कोमल वागसकर आणि सुहाना कमल युगल उद्यम सन्मान सांगली येथील पयोद इंडस्ट्रीजच्या स्नेहल व देवानंद लोंढे यांना जाहीर झाला आहे. येत्या गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी घोले रस्त्यावरील पं जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सायं ५ वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

या पुरस्कारची घोषणा प्रविण मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त विशाल चोरडिया यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. सुहाना कमल पुरस्कार समितीच्या अध्यक्षा आणि माजी खासदार वंदना चव्हाण, पृथ्वीराज घोरपडे हे या वेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  तरुण लेखिकांनी 'घागर मे सागर भरायचे' तंत्र अवलंबून कुमारवयीन पिढीसमोर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नवा इतिहास समोर ठेवला आहे

येत्या गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी घोले रस्त्यावरील पं जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सायं ५ वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉ शां. ब.  मुजुमदार आणि नटरंग फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती वंदना चव्हाण यांनी दिली.

पुरस्काराबद्दल बोलताना विशाल चोरडिया म्हणाले, “प्रवीण मसालेवाले अंतर्गत मसाले, लोणंची, पापड आदी उत्पादने तयार करण्यास प्रवीण मसालेवालेचे संस्थापक आदरणीय स्व. हुकमीचंद (भाऊ) चोरडिया आणि स्व. सौ. कमलबाई चोरडिया (बाई) यांनी सहा दशकांपूर्वी सुरुवात केली. सातत्यपूर्ण दर्जेदार गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुख सेवा या जोरावर अल्पावधीतच प्रविणची उत्पादने नावारुपास आली. भाऊ आणि बाईंच्या अथक परिश्रम आणि व्यवसायापोटी असलेली सचोटी आणि त्यानंतर पुढे चोरडिया परिवारातील पुढील पिढीतील सदस्यांनी या व्यवसायाला काळानुरुप आकार दिला व बदल घडवत सुहाना, अंबारी, प्रविण, सर्वम या ब्रॅन्डच्या अंतर्गत असलेली सर्व उत्पादने आणि व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सर्वोतोपरी योगदान दिले. आज आम्ही देत असलेल्या या पुरस्कारांमागे या दोघांचीच प्रेरणा आहे.”

अधिक वाचा  कथ्थक नृत्यविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

आपल्या उमेदीच्या, संघर्षाच्या काळात स्व. हुकमीचंद (भाऊ) चोरडिया आणि स्व. सौ. कमलबाई चोरडिया (बाई) या दोघांना आणि त्यांच्या उद्योग व्यवसायातील प्रगतीला अनेक व्यक्ती- संस्थांनी वेळोवेळी प्रोत्साहित केले, कौतुकाची थाप दिली. यामधूनच दोघांनी प्रेरणा घेत अधिक जोमाने, उत्साहाने आपला उद्योग व्यवसाय सुरु ठेवला. याच संकल्पनेचा आधार घेत माझे वडील राजकुमार चोरडिया यांनी उद्योग व्यवसायात अतुलनीय कार्य करणाऱ्या महिलांना उद्योग जननी कमल पुरस्कार देण्यास २००० सालापासून सुरुवात केली. कोविडच्या खंडानंतर आता या पुरस्काराची पुनःरचना करून ‘सुहाना कमल पुरस्कार’ नव्या स्वरूपात सादर करून चोरडिया कुटुंबाची पुढील पिढी समर्थपणे हा वारसा चालवीत असून व्यवसायाबरोबरच समाजकार्यात देखील अग्रेसर आहे, असे विशाल चोरडिया म्हणाले.

हे पुरस्कार वितरीत करीत असताना ते निरपेक्षपणे दिले जावेत या हेतूने ट्रस्टच्या वतीने आयोजन व निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. माजी खासदार वंदना चव्हाण या समितीच्या अध्यक्षस्थानी असून समितीमध्ये मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत – प्रभावळकर, माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर, न्यायाधीश शालिनी फणसळकर – जोशी, जेष्ठ पत्रकार विजया पाटील, शिक्षणतज्ज्ञ स्वाती मुजुमदार, उद्योजिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा समावेश आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love