चिपको आंदोलनाची आठवण आणि माझे कर्तव्य

चिपको आंदोलनाची आठवण आणि माझे कर्तव्य
चिपको आंदोलनाची आठवण आणि माझे कर्तव्य

सर्वत्र उत्तम पाऊस सुरु आहे. निसर्ग भरून पावला आहे. तो आपल्याला भरभरून देतोय पण आपण ? पर्यावरण संरक्षणासाठी माझे कर्तव्य काय? माझ्या रोजच्या आयुष्यातील कोणत्या अनावश्यक मागण्या मी कमी करू शकतो  यावर आपला आपण विचार सुरु केला की, आपले स्वतःलाच अनेकविध उपाय सुचू शकतील. आपल्यामुळे प्रकृतीवर किती भार पडतो याचे आकलन आपल्याला व्हायला सुरुवात झाली की आपली आणि प्रकृतीची नाळ पुन्हा जुळायला सुरुवात होते….

मग आपोआपच आपल्या वागण्यात, वस्तू चा वापर करण्यात बदल होऊ लागतील. मुळात आपण प्रकृतीमधून, निसर्गामधून आपण ओरबाडून घेत असलेल्या संसाधनाचा अपव्यय जरी टाळला तरी आपण आपले प्रकृती वंदनचे कर्तव्य पार पाडण्याच्या दिशेने अग्रेसर होऊया.

अधिक वाचा  धनकवडीत ११ गणेश मंडळांची संयुक्त अनोखी मिरवणूक : आदिवासींचे पारंपरिक नृत्य आणि संगीताने गणेश भक्त तल्लीन

प्रकृतीसाठी बलिदानाचा परमोच्य बिंदू अमृतदेवींच्या रुपाने आपल्यासमोर येतो. १७८७ च्या काळात जोधपूर नजीकच्या खेजडली गावातील ही घटना आहे. जोधपूरचे महाराजा अभयसिंह यांनी मेहरंगड येथे एक महाल बांधायचा होता. बांधकामासाठी लाकडाची आवश्यकता पडल्यानंतर राजाच्या शिपायांनी खेजडली गावाकडे आपला मोर्चा वळवला. झाडे तोडण्यासाठी सैनिक गावात पोहोचल्याची बातमी गावकऱ्यांना मिळाली. याच गावकऱ्यांमधील महिलांमध्ये एक अमृतदेवी नावाच्या महिला आणि त्यांचा परिवार  होता. बिश्नोई समाजामध्ये काही वृक्ष, पशू यांचे संरक्षण करणे हे आद्य कर्तव्य मानले गेले आहे. याच कर्तव्याप्रती अडीग असल्यामुळे अमृतदेवींनी आलेल्या सैनिकांना झाडे तोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. परंतू झाडे तोडून नेली नाहीत तर राजाज्ञा मोडल्याचा अपराध होईल या भीतीने सैनिक इरेला पेटले. बघता बघता ही बातमी आजूबाजूच्या अनेक गावांपर्यंत पोहोचली. बिश्नोई समाजाचे अनेक नागरिक  अमृतदेवींच्या बरोबर उभे राहू लागले. सैनिक मागे सरकत नाहीत हे लक्षात आल्यानंतर झाडं वाचविण्याचा एक उपाय म्हणून अमृतादेवी, त्यांच्या मुली आणि जमलेल्या सर्व लोकांनी झाडांना मिठ्या मारायला सुरुवात केली.

अधिक वाचा  जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला-  ‘मुलखावेगळी ती’: योगातून जागतिक कीर्ती मिळविणाऱ्या डॉ. पल्लवी कव्हाणे

अचानक झालेल्या या प्रकाराने सैनिकांनी माणसांसह झाडे कापायला सुरुवात केली. सैनिक भानावर येईपर्यंत ३६३ स्त्री, पुरुष, मुले यांनी झाडांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. ही बातमी राजाच्या कानावर पोहोचून आज्ञा मागे घेईपर्यंत बराच उशीर झाला होता.  घटना समजल्यावर राजाला अतोनात दुःख झाले. बलिदान दिलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ त्याने एक स्मारक  बांधले आणि त्या दिवसापासून खेजडीच्या झाडाला अभय मिळाले. इतक्या नागरिकांनी प्राणाची आहुती द्यायला लागावी ही घटना कोणत्याच प्रकारे स्तुत्य नाही पण पर्यावरण संरक्षणाचे आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्राणांचे बलिदानही छोटे आहे असे समर्पणाचे थोर उदाहरण या माऊलीने, तिच्या बलिदान दिलेल्या तीन मुली आणि इतर सदस्यांनी आपल्यासमोर ठेवले आहे. अमृतदेवी यांच्यासारखी इतर अनेक उदाहरणे आपल्याला भारताच्या प्रत्येक भागांत सापडतील कदाचित. पण अशा उदाहरणांमधून स्वतंत्र भारतातील पर्यावरण संरक्षण करण्याच्या दृष्टीने आपण काय बोध घ्यायचा?

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love