पुणे-मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेबाबत आपल्याला शंका आहे. हे सरकार सर्वोच्च न्यायलायचेसुद्धा ऐकत नाही, मग ऐकणार तरी कुणाच? हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकत नाही असा आरोप करत असा सवाल करत हिम्मत असेल तर राज्य सरकारने धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन दाखवावे असे आव्हान शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिले आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी झालेल्या नोकरभरतीतील उमेदवार मुला-मुलींना आता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या अन्यायग्रस्त मुलांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज शिवसंग्रामच्या वतीने.विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते. मेटे यांनी सरकारवर आणि आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकत नाही’, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. मात्र, त्यांच्या भाषणात निव्वळ पोकळ गप्पा होत्या आस टीका त्यांनी केली,