Nana Patole : जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकसंघ असून लोकसभा निवडणुकीत(Loksabha Election) राज्यात महाविकास आघाडी ४० ते ४१ जागा जिंकेल असा दावा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. (There is no difference in the Mahavikas Aghadi over seat allocation)
पुण्यातील काँग्रेस भवन(Congress Bhavan) येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पटोले बोलत होते. माजी राज्यमंत्री, आमदार डॉ. विश्वजीत कदम (Dr. Vishwajit Kadam) , आमदार रविंद्र धंगेकर(Ravindra Dhangekar), माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी(Mohan Joshi), उल्हास पवार(Ulhas Pawar), दिप्ती चवधरी(Dipti Chavadhari), प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड(Abhay Chajed), शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde)आदींसह पदाधिकारी उपस्थित होते..
पटोले म्हणाले, शरद पवार(Sharad Pawar), मी किंवा उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यापैकी कोणीही अद्याप जागावाटपासंदर्भात काहीही बोललेलो नाही. जागावाटपावरून मतभेद असल्याच्या बातम्या निराधार असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटपाचा प्रश्न दिल्लीमध्ये होणार्या बैठकीत मार्गी लावला जाणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. जे कोणी भाजपच्या विरोधात लढण्यास तयार आहेत, त्यांना सोबत घेण्याची आमची भूमीका असल्याचे पटोले यांनी अॅड. प्रकार आंबेडकर (Prakash Ambedkar) व राजू शेट्टी(Raju Shetti) यांच्या आघाडीतील समावेशाच्या प्रश्नावर स्पष्ट केले. दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाचे उद्या बैठक होणार आहे, या बैठकीत राज्यातील परिस्थितीची माहिती वरीष्ठांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.