शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या तेजोमय सूर्याचा अस्त


संगमनेर- १९६२ साली हरियाणा मधून पुण्यात येवून सायकलवर गोळी बिस्कीट विकण्याचा व्यवसाय सुरू करून मुलांच्या मदतीने  मसाला आणि ड्रायफ्रूटच्या व्यवसायात संपूर्ण हिंदुस्थानात आपले नाव प्रस्थापित केलेले पुण्यातील सच्चासौदा पेढीचे रघुवीरशेठजी गोयल यांचे नुकतेच दुख:द् निधन झाले.

श्री.रघुवीरशेठजी गोयल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते. दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. परिवर्तनी एकादशीच्या पवित्र दिवशी ते आपल्यातून निघून गेले.

१९६२ साली हरियाणा मधून पुण्यात येवून सायकलवर गोळी बिस्कीट विकण्याचा व्यवसाय सुरू करून १९६६ साली बी.जी गोयल नावाने गणेश पेठेत एक दुकान आपल्या दोन लहान भावंडाना सोबत घेवून चालू केले. व्यवसाय बघता बघता मोठा होत चालला होता. त्याचप्रमाणे कुटुंब ही मोठे होत चालले होते. मोठ्या भावाची भूमिका त्यांनी आपल्या दोन्ही लहान भावाची जबाबदारी घेवून अगदी वडिलांना शोभेल अशीच निभावली.

अधिक वाचा  वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौक प्रकल्प ठरेल पथदर्शी- मुरलीधर मोहोळ

पुढे 1977 साली त्यांनी जिंदल एजन्सी मध्ये भागीदारीत व्यवसाय सुरू केला. मुले मोठी होत होती हळूहळू व्यवसायात शिवसेठ आणि अशोकसेठ मदतीला येवू लागले तसातसा व्यवसाय मोठा होत गेला आणि पुढे विनोदसेठ यांनाही व्यवसायाची गोडी लागली. काळाची गरज ओळखून रघुवीरशेठजी यांनी १९९१ साली सच्चा सौदा पेढीची स्थापना केली आणि पुण्यात सायकल वर गोळी बिस्कीट विक्रीचा व्यवसाय सुरू केलेल्या या व्यक्तीने आपल्या तिन्ही मुलांच्या मदतीने  मसाला आणि ड्रायफ्रूटच्या व्यवसायात संपूर्ण हिंदुस्थानात आपले नाव तयार केले.

कुठेही जा सच्चासौदा पेढीला काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यन्त ओळखत नाही अशी पार्टी नाही. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी आपुलकीने चौकशी करणे फक्त व्यापार डोक्यात न ठेवता त्याला योग्य तो सल्ला देणे हा त्यांचा स्वभाव होता.अतिशय धार्मिक दानशूर आणि सामजिक कार्यात हिरीरीने सहभाग असलेले हे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने पुणे मार्केटयार्डमधून व्यापारात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येण्यासारखी आहे.

अधिक वाचा  कोट्यवधी रुपये भरलेल्या बॅगा पुणे पोलिसांनी केल्या जप्त : कर्नाटक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई?

गुरुनाथ भिकन बाप्ते

   संगमनेर

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love