सत्ताधारी पक्षाला शरद पवारांची भीती वाटते – धनंजय मुंडे


पुणे–एखाद्या 25 वर्षाच्या नेत्याची ज्या पद्धतीने भीती केंद्रातील सत्ताधाऱ्यांना आहे, तीच भीती या क्षणाला सत्ताधारी पक्षाला शरद पवार यांची आहे असे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे म्हणाले. “होत्याच नव्हतं, नव्हत्याच होतं “या म्हणीचा प्रत्यय ८० वर्षाच्या शरद पवारांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला त्यामुळे सत्ताधारी पक्षाला त्यांची भीती वाटते असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्णबधिर बांधवांसाठी मोफत श्रवणयंत्र वितरणाचा कार्यक्रम बुधवारी भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभ मुंडे बोलत होते. यावेळी   प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,   शिरूर लोकसभा मतदारसंघाचे  खासदार डॉ. अमोल कोल्हे,शिरूरचे आमदार अशोकराव पवार, पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघेरे  उपस्थित होते.

अधिक वाचा  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार यांचे फोटो मॉर्फ करुन घाणेरड्या व अश्लिल पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट केल्या प्रकरणी इटेलिक्चुअल फोरम व्हॉटसअ‍ॅप ग्रुप, कोमट बॉईज अँड गर्ल फेसबुक ग्रुप, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब यांच्यावर गुन्हा दाखल

मुंडे म्हणाले लोकशाही फार बदललेली आहे. आजच्या लोकशाहीमध्ये 64 आमदारांचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदारांचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदारांचा मंत्री होतो आणि 105 आमदार असणारा विरोधी पक्षात बसतो. या लोकशाहीचे उभ्या देशाला दर्शन घडवण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. होत्याच नव्हतं, नव्हत्याच होतं ही म्हण ऐकत होतो. पण, विधानसभेच्या निवडणुकीत या म्हणीचा प्रत्यय शरद पवार यांनी दाखवून दिला आहे,” असेही धनंजय मुंडे म्हणाले.

“दिल्लीच्या सीमेवर सर्व शेतकरी केंद्र सरकारच्या शेती धोरणाचा विरोधात कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचं रक्त सांडले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रामाणिक आंदोलनाला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही,” अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वयंपाकघरात शिजणारे अन्नसुद्धा शेतकऱ्याने मेहनतीने, घाम गाळून, रक्त सांडून पिकवले आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाची जाणीव ठेवून या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे खंबीरपणे राहिले पाहिले. शेतकरी जिवंत राहील तर तुम्ही आम्ही जिवंत राहू,” असेही मुंडे म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love