#दिलासादायक: पुण्यातील कोरोनाची लाट ओसरती आहे


पुणे – कोरोनाने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे रविवारी निदर्शनास आले आहे. रविवारी दिवसभरात शहरात केवळ १८० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ७५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना मृत्यूची संख्या देखील कमी झाली असून , पुण्यात सोमवारच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधीत ३३ रुग्णांचा मृत्यू झाला तर त्यातले ९ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

 सध्या शहरात ८४४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजच्या आकडेवारीनंतर पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४ लाख ६९ हजार ९२७ झाली आहे.

दरम्यान, शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असून गेल्या पाच दिवसात शहरात आढळणाऱ्या नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०० च्या जवळ पोहचली आहे.पुणे शहरातल्या गेल्या पाच दिवसातील कोरोना आकडेवारीवर नजर टाकली तर २७ मे रोजी दिवसभरात ५८८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली होती तर दिवसभरात ९२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता, २७ मे रोजी ८१९३ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली होती. २८ मे रोजी दिवसभरात ५७३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली होती आणि  दिवसभरात ९९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. २८ मे रोज  पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या  ७५३५ इतकी होती तसेच ८ हजार २०० नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली होती.

अधिक वाचा  “कोरोनाग्रस्त पेशंटच्या बेडवरती रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होतात,कुठे आहेत? “पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा”- पुण्यात लागले फ्लेक्स

२९ मे दिवसभरात ५५९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ तर दिवसभरात १०२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता आणि ३० मे रोजी दिवसभरात ४८६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली होती तसेच दिवसभरात ८८७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता, ३० तारखेला पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ६६१५ इतकी होती

त्यामुळे गेल्या चार दिवसाच्या या आकडेवारी वरून पुण्यातील कोरोना संसर्ग  वेगाने कमी होत असल्याचे आशादायक चित्र असून हा ट्रेंड सोमवारी देखील कायम होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love