टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने आज आपल्या अनोख्या उपक्रमाची – प्रोजेक्ट विस्तारची घोषणा केली. भारतातील कानाकोपऱ्यात रंगीत पत्र्यांची सर्वोत्तम उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही संकल्पना टाटा ब्लूस्कोप स्टीलकडून राबविण्यात येत आहे. सध्या टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे संपूर्ण भारतात ६००० पेक्षा जास्त वितरक आहेत. या वितरकांद्वारे ‘ड्यूराशाईन®’ या ब्रँड नावाने कलर कोटेड स्टीलची छते आणि इतर उत्पादने उपलब्ध आहेत. प्रोजेक्ट विस्तारमुळे सामान्य, होतकरू व्यक्ती माफक भांडवलामध्ये टाटा ब्लूस्कोप स्टीलची डीलर होऊ शकते.

याचे काही फायदे खालीलप्रमाणे :

  • टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी
  • विश्वासार्ह डीलर म्हणून तुमची ओळख निर्माण होऊन इतर उद्योगांच्या नवनवीन संधी तुम्हांला उपलब्ध होणार
  • अग्रगण्य आणि विश्वासार्ह ब्रँड ड्यूराशाईन® – सर्वोत्तम स्टीलची छते आणि इतर उत्पादने उपलब्ध
  •  महाराष्ट्रातील ३५० पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये, तसेच ग्रामीण भागात उपलब्ध करणार
  • जवळच्या शहरांमधील बाजारपेठांवर अवलंबून राहण्याची गरज नाही
  •  छोट्या व्यवसायांसाठी अधिक संधी

डीलर्ससाठी यात काय आहे?

  • इंटरनॅशनल टेक्नोलॉजीने बनलेले मजबूत, टिकाऊ पण आकर्षक ड्यूराशाईन® छते आता डीलर्सला ग्रामीण भागातदेखील उपलब्ध. यामध्ये छतांसाठी आवश्यक असलेल्या इतर साहित्यांचादेखील समावेश असेल.  
  •  छोट्या शहरांमध्ये जास्त मागणी असलेली आणि किफायती अशी कूलशील्ड (इन्सूलेटेड शीट) आणि वूडलाईन (वूड फिनिश लाईनर शीट) यांसारखी नाविन्यपूर्ण आणि आधुनिक विशेष उत्पादने.
  •  डीलर्सना त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन, उदा. जवळच्या फॅब्रिकेटर्सचे प्रशिक्षण आणि विकास.
  •  ब्रँडिंग आणि मार्केटिंग साहित्यासोबतच मार्गदर्शन
  •  प्रतिष्ठेच्या अशा ड्यूराशाईन® डीलर लॉयल्टी प्रोग्राम मध्ये सहभागी होण्याची संधी. ही योजना टाटा ब्लूस्कोप स्टीलने भारतातील सर्व डिलर्ससाठी सुरु केलेली असून, डीलर्सना त्यांचा व्यवसाय मजबूत करण्यास मदत करते.
  •  प्रोजेक्ट विस्तारच्या पुढील कार्यक्रमाअंतर्गत ड्यूराशाईन® गॅलेरिया आणि ड्यूराशाईन® सेलेक्ट या नावाने ड्यूराशाईन® ची  शो रूम्स सुरु करण्यात येतील.
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *