#The mastermind of the drug racket :ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड काटमांडू मार्गे कुवेतला पळाला

The mastermind of the drug racket fled to Kuwait via Kathmandu
The mastermind of the drug racket fled to Kuwait via Kathmandu

#The mastermind of the drug racket : पुणे ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड संदीप धुनिया(Sandip Dhuniya) असल्याचे समोर आले आहे. 2016 मध्ये महसुल गुप्तचर संचलानालयाने केलेल्या कारवाईत प्रमुख आरोपी होता. सर्वात महत्वाचे म्हणजे कुरकुंभ एमआयडीसीतच ही कारवाई करण्यात आली होती. 159 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते. तो ब्रिटीश पासपोर्टवर आहे. त्याला भारतात येण्यासाठी व्हिजाची गरज नाही. त्याच संधीचा फायदा घेत त्याने ड्रग्ज रॅकेट चालविण्याचा धंदा सुरू केला होता. 30 जानेवारीला तो नेपाळ काटमांडु मार्गे कुवेतला पळाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

धुनिया हा मुळचा बिहार पटना येथील आहे. त्याच्याकडे ब्रिटीश नागरीकत्व आहे. बिपीन कुमार हा त्याचा मित्र होता. तो सध्या अमली पदार्थाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. सोनम पंडीत ही बिपीन कुमारची पत्नी आहे. मात्र, धुनिया याने तिला आपली गर्लफ्रेंड बनविले. याबाबत बिपीनच्या वडीलांनी तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आतापर्यंत पोलिसांनी साडे सतरा शे ते अठराशे किलो इतके मेफेड्रॉन जप्त केले आहे. यामध्ये आतापर्यंत आठ जणांना अटक केले आहे.

अधिक वाचा  उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल शर्मिला ठाकरे म्हणाल्या ...

दरम्यान पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक  उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजीत पवार यांनी केले आहे.

वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (40, खडीचे मैदान, सोमवार पेठ),  अजय अमरनाथ करोसीया (35, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (40, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (46,रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (41, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबीवली पश्चिम, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर दिल्ली येथून दिवेश भुतीया (39) आणि संदीप कुमार (42, दोघेही रा. दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले असून दोघांनाही ट्रान्झीट रिमांडद्वारे पुण्यातील न्यायालयात हजर करून त्यांची पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे. तर आयुब अकबर मकानदार याला सांगलीतून अटक करण्यात असून त्याच्याकडून 300 कोटींचे 145 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

अधिक वाचा  आरोग्यदायी लोणची बनवा घरच्या घरी

कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबरोटरीज येथे छापा टाकल्यानंतर पुणे पोलिसांना तेथून देशातील विविध भागात मेफेड्रॉन पाठविल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दहा ते पंधरा पथके तयार करून पोलिसांनी दिल्लीसह राज्यातील विविध भागात छापे टाकले. यावेळी दिल्लीत मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. दररोज दहा दहा किलोच्या पॅकेटने फुड डिलीव्हरीच्या माध्यामातून मेफेड्रॉन लंडनला पाठविले जात होते. मागील दोन वर्षापासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. विदेशात मेफेड्रॉनची विक्री करण्याची मदार धुनियावर होती. धुनिया यानेच मुंबईतील एका व्यक्तीशी संपर्क केला होता. तर मकानदार हा धुनिया सोबत 2016 च्या ड्रग्जच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जेरबंद होता. पोलिसांनी या रॅकेटची पाळेमुळे खोदण्यासाठी कंबर कसली आहे. सुरवातीला पोलिसांनी डिलीव्हरी करणार्‍यांची साखळी उध्वस्त केली. त्यानंतर निर्मिती करणारे युनिट आणि साठवणुक करणारी ठिकाणे त्यांनी शोधून काढली. या गुन्ह्यात आणखी 4 ते पाच जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love