शशिकांत पवार यांनी गैरप्रकार केल्यामुळे त्याचे अध्यक्ष पदाचे अधिकार गोठविले – राजेंद्र कोंढरे : मराठा महासंघ वाद चिघळला


पुणे-अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी काही गैरप्रकार केल्यामुळे त्याचे अध्यक्ष पदाचे सर्व अधिकार विशेष सर्वसाधारण सभेने गोठविले आहेत. त्यामुळे त्यांना पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका  बरखास्त करण्याचा अथवा बडतर्फ करण्याचा अधिकार घटनेप्रमाणे नाही. तसेच विशेष सर्वसाधारण सभेमध्ये  शशिकांत पवार यांचे अध्यक्षपदाचे सर्व गोठविलेले अधिकार एकमताने महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत पवार यांनी दादरच्या शिवाजी मराठा संस्थेत बैठक बोलावली होती. यामधे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांची पदावरून हकालपट्टी करतानाच त्यांनी नेमणूक केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द केल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी रविवारी ( ता. ३) पुणे येथे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अध्यक्षपदाचा ठराव मांडून स्वतःची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्याचे जाहीर केले. यावरूनच मराठा महासंघात शशिकांत पवार विरूध्द राजेंद्र कोंढरे असा नवा वाद सुरू झाला आहे.

अधिक वाचा  महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा -अजित पवार

अखिल भारतीय मराठा महासंघाचे सभासद व पदाधिकाऱ्यांची विशेष सर्वसाधारण सभा 3 ऑक्टोबर रोजी पुण्यात संपन्न झाली. या सभेमध्ये तीन महत्वाचे ठराव पारित करण्यात आले. या सर्वसाधान सभेत झालेल्या ठरावांची पत्रकार परिषदेत देण्यात आली.

1. शशिकांत पवार यांनी नियमबाह्य पद्धतीने आपल्प अधिकाराचा दुरुपयोग करून लादलेल्या सर्व नियुक्त्या  रद्द करण्यात आल्या.

2. राज्यव्यापी मराठा संपर्क अभियानाची सुरुवात करणे, युवक, विद्यार्थी उद्योजक संघटना वाढविण्यासाठी निर्णय घेणे, राज्यातील राज्य, विभागीय जिल्हा व तालुका पातळीवरील लोकशाही पद्धतीने स्थानिक सभासदातून निवड झालेल्या पदाधिकारी निवडीची नोंद घेऊन त्यांना मान्यता देण्यात आली व  शशिकांत पवार यांनी घटनाबाह्य लादलेल्या  नेमणुका सभेने रद्द केल्या.

3. अखिल भारतीय मराठा महासंघ मध्यवर्ती कार्यालयाच्या मुंबई येथील इमारत पुनर्विकास गैरव्यवहाराबाबत  सभेला लेखी माहिती देऊन या सभेस उपस्थितीत असलेल्या सभासदांच्या उपस्थितीत तसेच शासकीय पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष साक्षीने दि. 3 ऑक्टोबर २०११ रोजी मुंबई येथील अखिल भारतीय मराठा महासंघ इमारत पुनर्विसनाबाबत अधिकार नसताना संस्थेचे केलेल्या आर्थिक गैरव्यवहार व नुकसानीची नोंद घेऊन विशेष सर्वसाधारण सभेने एकमताने शशिकांत पवार यांचे अध्यक्ष पदाचे सर्व अधिकार गोठविले आहेत. त्यामुळे एकदा सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय हा सर्वोच्च असतो. त्यामुळे त्यांनी काढलेल्या कुठल्याही पत्रकाला वा पत्राला नैतिक व कायदेशीर काहीच अर्थ व हक्क नाहीत.

अधिक वाचा  बारावीचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के : यंदाही मुलींचीच बाजी : पुणे विभागाचा निकाल ९४.४४ टक्के

गेले अनेक महिन्यापासून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांनी शशिकांत पवार व  दिलीप जगताप यांनी केलेल्या वेकायदा करार इतर कागदपत्रांची मागणी शशिकांत पवार यांच्याकडे केली, लेखी माहिती मागितली परंतु शशिकांत पवार यांनी जाणूनबुजून कुठलीही लेखी माहिती मराठा महासंघाच्या कुठल्याही पदाधिकारी व सभासदांना दिली नाही असा आरोप राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत केला. शशिकांत पवार यांनी विकासक व इतरांशी एकमेकांच्या संगनमताने एकमेकांच्या फायद्यासाठी पदांचा गैरवापर करून जे दस्तऐवज व करार केले आहेत, ते कसे कायदेशीर व योग्य व संघटनेच्या हिताचे आहेत हे एखाद्या तज्ञ वास्तुविशारद व वकिलांकडून जाहीर करावेत असे आवाहन कोंढरे यांनी केले.

संघटनात्मक पदे निवडताना स्थानिक सभासदांकडून राज्यातील 176 तालुके व 28 जिल्हा – शाखा पदाधिकारी व संभासदांनी लोकशाही पद्धतीने निवडले आहेत त्यांचे मान्यता काढण्याचा अधिकार एकट्या माजी अध्यक्षांना नाही असेही कोंढरे म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love