लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


पुणे- जागतिक निसर्ग दिनाचे औचित्य साधून व लायन्स ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने पानशेत – वांजळवाडी येथे निसर्गपुरक देशी झाडे लावण्यात आली.

 लायन्स क्लबच्या वतीने दरवर्षी ऑक्टोबर सेवा सप्ताहा चे आयोजन करण्यात येते त्याअंतर्गत लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम च्या वतीने पानशेत येथील वांजळवाडी या गावात जांभूळ, सीताफळ, आपटा, करंज, बांबू, पेरू,काटेसावर आदी देशी झाडांची लागवड करण्यात आली.

निसर्गसंवर्धन व संरक्षण यावर क्लबचा नेहमीच भर असून त्यासाठी क्लबकडून विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून जागतिक निसर्ग दिनी वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी क्लबचे अध्यक्ष लायन महेश गायकवाड, सेक्रेटरी लायन मधुकर कोटा, खजिनदार लायन प्रकाश कुलकर्णी, सदस्य लायन सीमा कुलकर्णी, गजानन बिरामणे, कोमल बिरामणे, मिताली कोटा, तन्मय गायकवाड आदी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  जैवविविधतेचं उपवन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ..! : जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने विद्यापीठाची हरित सफर