जन्मठेपेची 21 वर्षे शिक्षा भोगून आलेल्यांच्या आयुष्याला मिळाली नवी कलाटणी


पुणे–शुभारंभ लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्यावतीने प्रेरणा पथ हा उपक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत जन्मठेपेची 21 वर्षे शिक्षा भोगून आलेल्या बंदिवानास जर्सी गाय आणि कालवड देण्यात आले.

या गायी च्या माध्यमातून नंदू शंकर पवार मुक्काम पोस्ट कनगर तालुका राहुरी जिल्हा नगर या बंदिवानाने आपले नवीन आयुष्य सुरू केले आहे. गाईच्या साह्याने दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे नंदू पवार आणि आणि त्यांचा मुलगा श्याम पवार यांनाही गाय आणि कालवड देण्यात आले.

यावेळी अप्पर पोलीस महासंचालक कारागृह चे सुनील रामानंद कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई,  सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार, अड.प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, शकुंतला सातपुते, डॉ. हंसराज डेंबरे,राजेंद्र कदम, सुरेश कोते,  भाऊसाहेब करपे , सौ कल्पना भेगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  अभाविपचे 'घर घर तिरंगा-मन मन तिरंगा'अभियान: पुणे शहरात ११११ कार्यक्रमांचा संकल्प

यावेळी बोलताना सुनील रामानंद म्हणाले, बंदीवान आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरु करू शकतात आणि त्यांच्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळत आहे. हा उपक्रम केवळ पुण्यातील एका कारागृह पुरता मर्यादित न राहता राज्यभर राबविण्यात यावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व मदत करण्यात येईल. समाजात असे चांगले बदल देखील आदर्श निर्माण करतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यापूर्वी या उपक्रमांतर्गत एका बंदिवानास चप्पल दुकान सुरू करून दिले तर एकाच ऑर्केस्ट्रा सुरू करून दिला आणि आणि त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली.

या कार्यक्रमासाठी सौ शुभांगी आफळे, संजय सातपुते, दीपक वनारसे, नितीन आरोळे, राजाभाऊ कदम, आबा काळे,विनोद क्षीरसागर, विश्वास जोशी, ऋषिकेश गोसावी, अमोल कदम, लखन वाघमारे,मीनाक्षी नवले, मीना कुरलेकर,आप्पासाहेब गुड्स कर,  यांनी विशेष परिश्रम घेतले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love