कँडललाइट कॉन्सर्ट्सचा पुण्यात शुभारंभाचा प्रयोग

कँडललाइट कॉन्सर्ट्सचा पुण्यात शुभारंभाचा प्रयोग
कँडललाइट कॉन्सर्ट्सचा पुण्यात शुभारंभाचा प्रयोग

पुणे- मुंबई, दिल्ली आणि अहमदाबादमधील प्रेक्षकांना उत्तम अनुभव दिल्यानंतर, कँडललाइट कॉन्सर्ट आता पुण्यात लाइव्ह म्युझिक आणि अप्रतिम कँडललाइट सेटिंग्जचे अनोखे मिश्रण घेऊन येत आहे. शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता खराडी येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेल येथे “सर्वोत्कृष्ट चित्रपट साउंडट्रॅक” हा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारो मेणबत्यांच्या प्रकाशात पियानो संगीतात न्हाहून निघण्याची अनोखी संधी पुण्यातील संगीत प्रेमींना मिळणार आहे.

फिव्हर लॅब्स इंकच्या लिव्ह युवर सिटी या विभागाद्वारे निर्मित या कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्थानिक कलाकार आणि संगीतकारांबरोबर एकत्र येऊन काम करणे आणि अनेक प्रेक्षकांपर्यंत  संगीत पोहोचवणे हा आहे. पुण्यातील या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कँडललाइट कॉन्सर्ट, मोठ्या प्रमाणात संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे.

अधिक वाचा  आपआपसातील दुही संपवण्यासाठी राम मंदिर निर्मिती महत्वाची -आचार्य गोविंद देवगिरी महाराज

30, 31 ऑगस्ट आणि 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.00, 7.00 आणि 9.00 वाजता सर्वोत्कृष्ट चित्रपट साउंडट्रॅक या कार्यक्रमाचे 3 प्रयोग होतील. तर या पुढच्या आवृत्तीमध्ये 27 आणि 28 सप्टेंबर रोजी कोल्डप्लेला आदरांजली वाहून प्रेक्षकांना संगीतमुग्ध केले जाईल. आणि त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी बीटल्सप्रती सांगीतिक कृतज्ञता व्यक्त केली जाईल.

या सगळ्याच कार्यक्रमामध्ये प्रत्येक सूर संगीत प्रेमींच्या थेट हृदयाशी जोडत संगीताच्या माध्यमातून एका अविस्मरणीय अनुभव पुणेकरांना मिळेल असा विश्वास आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love