महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तलयासमोर आंदोलन : महाविद्यालयात अल्पवयीन युवतीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण

महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तलयासमोर आंदोलन
महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तलयासमोर आंदोलन

पुणे(प्रतिनिधी) -कोरेगव पार्क येथे एका अल्पवयीन मुलीवर ड्रग्ज पार्टीत अल्पवयीन मुलांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अकरावी-बारावीच्या मुलांना ड्रग्ज कोठून सहज उपलब्ध होतात ही बाब चिंताजनक असल्याचे सांगत महिला सुरक्षिततेकडे लक्ष्य वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने  शुक्रवारी पुणे पोलीस आयुक्तलया समोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ऊबाठा शहराध्यक्ष गजानन थरकुडे उपस्थित होते.

पुणे शहरातील एका महाविद्यालयात अल्पयवयीन युवतीवर चौघांनी अत्याचार केले. आरोपींनी अमली पदार्थांचे सेवन केले होते. संबंधित महाविद्यालयाचे विश्वस्त सचिन सानप यांना या घटनेची माहिती होती. त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडित युवतीच्या वडिलांवर दबाव टाकला. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

अधिक वाचा  कधी कधी वाटतं आत्ता जो निर्णय घेतला आहे तो २००४ सालीच घ्यायला पाहिजे होता- अजित पवार

सानप मंत्रीमंडळातील एका मंत्र्याच्या निकटवर्तीय आहेत. दबावापोटी पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कारवाई केली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आली. पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलकांनी घोषणबाजी केली. ‘अल्पवयीन मुलीला न्याय द्या, महाविद्यालयाच्या विश्वस्तांना आरोपी करा, त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करा’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

अमली पदार्थाचे सेवन करून आरोपींनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. हे सर्व संस्थाचालकाला माहिती असूनही त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणातील पोलिसांनी तपासात त्रुटी न ठेवता, मुलीला न्याय द्यावा. संबंधित संस्थेत काही जण चुकीचे काम करीत आहेत. विश्वस्तांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी. युवतीला जर न्याय मिळाला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला.

यावेळी धंगेकर म्हणाले, पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असून सातत्याने पुण्यात ड्रग्ज सहज मिळत आहे. कोरेगावपार्क येथे एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन आरोपींसह सज्ञान आरोपींनी मिळून लैंगिक अत्याचार केले आहे. संस्थाचालक हा प्रकार त्यांच्या आवारात घडून देखील दडपण्याचा प्रयत्न करत आहे. संशयाचा सुई कोणाला वाचविण्यापर्यंत जात आहे. एका पोलीस हवालदार महिलेने हे प्रकरण समोर आणले आहे. या घटनेत ड्रग्ज आरोपींनी वापरले की नाही हा पोलीस तपासाचा भाग आहे. मुले जर ड्रग्ज घेत असेल तर ते ड्रग्ज कोण विकत आहे  हे शोधले पाहिजे. ज्या मुलीवर अत्याचार झाला तिला शाळेतून काढण्यासाठी दमदाटी करुन दाखला दिला आहे. मुलीस संरक्षण देता येत नसेल तर संस्थाचालक, शिक्षक यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली पाहिजे होती. परंतु दडपण टाकून हे प्रकरण दबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे पुणे शहर बदनाम होत असून अन्याय दडपणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. चुकीची लोक संस्थेत काम करत असून याबाबतचा पाठपुरावा आगामी काळात देखील आम्ही करणार आहे.

अधिक वाचा  मोदींपाठोपाठ अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर : हे आहे कारण..

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love