‘हीट अँड रन’ प्रकरण : अल्पवयीन आरोपीची पोलिस बाल निरिक्षण गृहात जाऊन करणार चौकशी

The investigation report of the 'hit and run' case has been submitted by the Pune Police to the Juvenile Justice Board
The investigation report of the 'hit and run' case has been submitted by the Pune Police to the Juvenile Justice Board

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील बाल सुधार गृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या चौकशीची परवानगी घेण्यासाठी पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाला पत्र लिहिलं आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी ही माहिती दिली आहे.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाची पुणे पोलिस बाल निरिक्षण गृहात जाऊन चौकशी करणार आहेत. चौकशीसाठी पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाकडे अर्ज केला आहे. चौकशीची परवानगी मिळताच पोलीस बाल निरिक्षण गृहात जाऊन चौकशी करणार आहेत. यावेळी या मुलाचे पालक किंवा वकील उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे चौकशीवेळी कोण उपस्थित राहणार याचीही चर्चा आहे. या मुलाची बाल निरिक्षण गृहातील कोठडी संपत असल्याने त्यापूर्वीच ही चौकशी करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रातून पहिल्यांदा शोधलेल्या बेडकाला मिळाली ओळख

अल्पवयीन आरोपीच्या बदललेले रक्ताचे नमुने महिलेचे

ससून रुग्णालयातील अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलले होते. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय अहवालानुसार, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना महिलेच्या रक्ताच्या नमुन्यासोबत बदलण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. रक्ताचा नमुना घेताना महिलेशिवाय आणखी दोन प्रौढ व्यक्तीही रुग्णालयात उपस्थित होते. आता ते दोघे कोण होते? या दोघांची ओळख पटवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे.

दोन अल्पवयीन मित्रांचे सुद्धा रक्ताचे नमुने बदलण्यात आले

दरम्यान अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्यानंतर त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांचे सुद्धा रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या तीन अल्पवयीन मुलांचे जे रक्तगट आहेत त्याच रक्तगटाची इतर तीन जण बोलावण्यात आले होते. त्यामधील एक महिला आणि दोन पुरुष होती अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे डॉक्टर श्रीहरी हळनोर हा कर्तव्यावर असताना हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रक्ताचे नमुने अन्य कोणी दिले असल्याने आता ते कोण याची चर्चा सुद्धा रंगली आहे.

अधिक वाचा  वैचारिक माओवादी आमच्या शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत : राष्ट्र प्रथम मानणाऱ्यांनी संघटित व्हायला हवे

अल्पवयीन मुलासह त्याच्या दोन मित्रांना ससून रुग्णालयामध्ये अपघाताच्या दुसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. त्या तिघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते, मात्र, त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी न देता इतर तीन व्यक्तींचे नमुने देण्यात आले होते. मात्र पुणे पोलिसांना शंका आल्याने दुसऱ्या सरकारी रुग्णालयात सॅम्पल घेऊन चाचणी केल्यामुळे हा भांडाफोड समोर आला होता

अल्पवयीन आरोपीच्या बदललेले रक्ताचे नमुने महिलेचे

दरम्यान, या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदललेल्या रक्ताचे नमुने हे त्याच्या आईचे (शिवानी अग्रवाल) असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिवानी अग्रवाल या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.   ससून रुग्णालयातील अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलले होते. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय अहवालानुसार, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना महिलेच्या रक्ताच्या नमुन्यासोबत बदलण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. रक्ताचा नमुना घेताना महिलेशिवाय आणखी दोन प्रौढ व्यक्तीही रुग्णालयात उपस्थित होते. आता ते दोघे कोण होते? या दोघांची ओळख पटवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love