मोहम्मद शमीच्या यशामागे या पाकिस्तानी माजी कर्णधाराचा हात

The hand of this former Pakistani captain behind the success of Mohammad Shami
The hand of this former Pakistani captain behind the success of Mohammad Shami

पुणे- ‘वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023′ (ODI Cricket World Cup 2023) मध्ये आपल्या दमदार आणि आक्रमक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाची  दाणादाण उडविणारा भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad shami) हा भारतीय क्रिकेट (Indian Cricket) प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मोहम्मद शमीचे ‘वर्ल्ड कप 2023 साठी’ भारतीय संघात आगमन झाले तेव्हापासून, जो प्रतिस्पर्धी संघ भारतासमोर आला तो उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहिले आहे.  मोहम्मद शमीने वर्ल्ड कप २०२३ मध्ये त्याने खेळलेल्या चार सामन्यांमध्ये १६ विकेट घेत भारतीय संघातील गोलंदाजामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे. मोहम्मद शमीच्या कामगिरीच्या सफलतेचे रहस्य नक्की काय आहे?  हा प्रश्न क्रिकेट प्रेमींच्या चर्चेचा विषय ठरला आहे. मोहम्मद शमीने आपल्या धारदार आक्रमक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा कसा फज्ज उडवला आणि विकेट घेत कसे नामोहरम केले आणि यामागील राज किंवा रहस्य काय आहे?  हे आपण समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण मोहम्मद शमीच्या या यशाचे रहस्य उलगडले आहे. (The hand of this former Pakistani captain behind the success of Mohammad Shami)

अधिक वाचा  बिल्कीस बानोला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुक निदर्शने

मोहम्मद शमीने (Mohammad shami) वर्ल्डकप 2023 मध्ये खेळलेल्या चार सामन्यांमध्ये आपला जलवा दाखवत विरोधी संघाची अक्षरश: दूरदर्शन केल्याचे आपण बघितले आहे. मोहम्मद शमीच्या हातात कप्तान रोहित शर्माने (Rohit Sharma) चेंडू दिल्यानंतर शमीने विरोधी संघातील फलंदाजांना बाद करत अक्षरशः धूळ चारली.

मोहम्मद शमीने वर्ल्डकप 2023 मध्ये पहिला सामना खेळला तो न्युझीलंडबरोबर या सामन्यात त्याने पाच विकेट घेतल्या होत्या.  त्यानंतर इंग्लंड बरोबर झालेल्या सामन्यात चार विकेट घेत त्याने इंग्लिश संघाची कमर तोडली.  त्यानंतर झालेल्या श्रीलंकेबरोबरच्या (Srilanka) सामन्यात शमीने पुन्हा पाच विकेट घेत दमदार कामगिरी केली तर दक्षिण आफ्रिकेबरोबर (South Africa) झालेल्या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या आणि सर्वात जास्त विकेट घेणारा भारतीय संघातील गोलंदाज ठरला.

शमीने चार सामन्यांमध्ये १६ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आठ सामन्यात १५ विकेट घेतल्या, रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आठ सामन्यात १४, कुलदीप यादवने (kuldeep Yadav) आठ सामन्यात १२ तर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) आठ सामन्यात १० विकेट घेतल्या. त्यामुळे सर्वात कमी डाव खेळून सर्वात जास्त विकेट घेणारा शमी हा भारतीय गोलंदाज ठरला आहे.मद

अधिक वाचा  अद्वैत सिद्धांताची भक्कम पायावर उभारणी करणारे आद्य श्री शंकराचार्य

मोहम्मद शमीच्या या यशाचे रहस्य काय आहे याचा उलगडा आता झाला आहे.  याबाबत मोहम्मद शमीचे पूर्वीचे प्रशिक्षक अब्दुल मोनायम (यांनी शमीच्या या यशाच्या मागे काय रहस्य आहे याचा उलगडा केला आहे. मोहम्मद शमीच्या या यशामागे पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याचा हात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्यांनी म्हटले आहे की,  शमी की कलाई की पोझिशन अच्छी है लेकीन, गेंद को कैसे रिलीज की जारी है ये, उन्हे वसीम अक्रमने  सिखाया है…

दरम्यान वसीम अक्रम यांनी ‘स्पोर्ट किडा’ या ‘न्यूज पोर्टल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, हे सर्व जरी असले तरी त्यामध्ये शमीचीही मेहनत तितकीच महत्त्वाची आहे.

वसीम अक्रम म्हणाले की, शमीने जेव्हा नवीन खेळाडू म्हणून पदार्पण केले त्यावेळी त्याने माझ्याबरोबर खूप वेळ व्यतीत केला. मला दोन दिवसांसाठी पाकिस्तानला जायचे होते त्यावेळी शमी मला सोडवायला आला. मी परतल्यानंतर तो गाडी घेऊन विमानतळावर मला घेण्यासाठी आला.  खरे तर त्याला हे करण्याची गरज नव्हती. तरीही तो आला.  त्यासाठी त्याला दाद द्यायला पाहिजे.  या सर्व घटनेमध्ये तो सातत्याने क्रिकेट बद्दल माझ्याशी चर्चा करायचा.  तसेच नाश्ता,  दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण करताना तो माझ्याबरोबरच असायचा त्याने अक्षरशा माझा पिच्छा पुरवला.  यावेळी त्याला रिव्हर्स स्विंग आणि गोलंदाजीतील इतर गोष्टींची माहिती त्याला दिली.अर्थात या सर्व गोष्टी सांगणे सोपे आहे मात्र, शमीने ते करून दाखवले.  यामागे त्याची मेहनत आहे.

अधिक वाचा  संतूरची तार निखळली : पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन : केवळ 500 रुपये घेऊन आले होते मुंबईत

मागच्या दोन-तीन वर्षापासून तो भारतीय संघाकडून सातत्याने गोलंदाजी करत आहे. वसीम अक्रम यांनी दिलेल्या टिप्स शमीला वर्ल्डकप 2023 मध्ये गोलंदाजी करताना कामी येत आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love