gtag('js', new Date());
  • Home
  • आरोग्य
  • #सावधान: पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढते आहे
Image

#सावधान: पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढते आहे

Spread the love

पुणे- पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवाळीअगोदर बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते. परंतु, आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. गेल्या 16 नोव्हेंबरला 359 नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर पुणेकरांना दिलासा मिळाला होता. परंतु, कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. बुधवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 25 नवीन रुग्णांची वाढ झाल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.The crisis of corona is increasing in Pune city and district

गेल्या महिनाभरात पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. 35 दिवसांनंतर पुन्हा एकदा 1 हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी 1 हजार 20 रुग्ण आढळले होते.

16 नोव्हेंबरला आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे फक्त 359 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 11 हजार 572 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना पाहायला मिळत असल्यानं प्रशासनाकडून कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 382 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 6 हजार 357 रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  'चेस दी वायरस' संकल्पना राज्यभर राबविणार-- उद्धव ठाकरे

Related Posts

पुण्यात उभारले जाणार ‘लता-आशा मंगेशकर रुग्णालय’; कॅन्सर सेंटरपासून ॲनिमल हॉस्पिटलपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)–“मंगेशकर कुटुंबियांनी केवळ संगीताचीच सेवा केली नाही, तर देशप्रेम आणि समाजसेवेचा एक नवा आदर्श समाजासमोर…


Spread the love
ByByNews24Pune Apr 16, 2026

हडपसरमध्ये ‘इंदिरा आयव्हीएफ’च्या नवीन केंद्राचे थाटात उद्घाटन

Spread the love

Spread the love पुणे (प्रतिनिधी):पुणे आणि परिसरातील निपुत्रिक दांपत्यांना आता जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक प्रजनन उपचार सुविधा हडपसरमध्ये…


Spread the love
ByByNews24Pune Feb 16, 2026

संचेती रुग्णालय आता स्ट्रोक रेडी सेंटर : ब्रेन स्ट्रोकवर मिळणार तातडीने उपचार

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)- अस्थिरोगावरील देशातील आघाडीच्या ‘संचेती रुग्णालया’ला आता ‘स्ट्रोक रेडी सेंटर’ म्हणून मान्यता मिळाली आहे. आपत्कालीन…


Spread the love
ByByNews24Pune Sep 24, 2025

#सावधान: पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढते आहे

by News24Pune time to read: <1 min
0