९ ऑगस्ट मूलनिवासी दिवस – वास्तव

महाराष्ट्र लेख
Spread the love

एखादी गोष्ट आपल्याला वरकरणी खूप छान वाटते.मात्र त्यामागचं सत्य कळलं की त्यातली भयानकता जाणवते.अगदी हीच गोष्ट ९ ऑगस्ट हा मूलनिवासी ( आदिवासी) दिनाच्या बाबतीत आहे.खरं तर हा दिवस  मूलनिवासींसाठी /जनजातींसाठी उत्सवाचा दिवस नसून तो रक्तरंजित इतिहासाचा दिवस आहे.हे त्यामागचं सत्य कळल्यावर पटतं.

९ ऑगस्टचा इतिहास……१९४२ मध्ये ,स्पेन आणि पोर्तुगालच्या राजांनी अटकाव/विरोध केला असताना सुध्दा कॅथॉलिक मिशनने दिलेल्या आर्थिक मदतीने ,भारतातील व्यापारासाठी भारताचा मार्ग  शोधण्याच्या उद्देशाने निघालेला कोलंबस चुकून अमेरिकेच्या पूर्व किनार्याशवर जाऊन पोहोचला.त्यावेळी अमेरिकेत पाच मूलनिवासींचे/आदिवासींचे आधिपत्य होते.चॅरॉकी,चोक्ताव, चिकासो,मास्कोगी व सेमिनॉल या त्या प्रमुख जमाती.

कोलंबसला वाटले हाच भारत देश आहे.आणि हे लोक भारतीय आहेत.म्हणून ते रेड इंडियन.विस्तृत क्षेत्रात सुखासमाधानाने नांदणार्यान या जमातींच्या सुखाला कोलंबसच्या येण्याने ग्रहण लागले.व्यापारासाठी निरनिराळी क्षेत्रे शोधणे ही तर गोर्यांयची खासियत.या व्यापार वृध्दीच्या मोहापायी ब्रिटिशांनी अमेरिकेत शिरकाव केला. तेथील जमातींच्या जमिनी हडप केल्या आणि तिथल्या मूळ निवासींना बेघर केले.गोर्यांानी आपल्या वसाहाती वाढवल्या.हळू हळू चर्चच्या प्रभावाखाली येऊन ब्रिटिश,ऑस्ट्रेलिया,न्यूझिलंड या देशांनी अमानुषपणे तेथील मूल निवासींना त्यांच्या जन्मभूमीतून नष्ट केले.

९ ऑगस्ट १६१० या दिवशी अमेरिकेतील पवनहाट युध्द सुरू झाले.गोरे युरोपियन आणि मूलनिवासी यांच्यातलं हे युध्द. अर्थातच संख्येने कमी असलेल्या मूलनिवासींचा पराभव झाला. १६१० ते १७७५ या काळात इंग्रजांनी अमेरिकेच्या मूलनिवासींना अनन्वीत अत्याचाराने,अतिशय अमानुष पध्दतीने ठार केले.

ब्रिटिश सेनेचे प्रमुख सर जेफ्री आमर्स्टन यांनी विश्र्वातील पहिले रासायनिक युध्द करून ८०म टक्के  लोकांना तडफडून मारले.आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिश सेनेने अमेरिकेतील मूलनिवासींचे केलेले हे भयानक हत्याकांड होते.ब्रिटिशांनी १७७५ पर्यंत अमेरिकेवर आपले आधिपत्य प्रस्थापित केले होते.२० टक्के मूलनिवासी अमेरिकेत शिल्लक होते.

कोलंबसच्या अमेरिकेतील पदार्पणाला ९ ऑगस्ट १९९२ ला ५०० वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने ‘ कोलंबस डे – थॅंक्स गाव्हिंग डे ‘ साजरा करण्याची जोरात तयारी सुरू होती.पण तिथे शिल्लक असलेल्या मूलनिवासींनी त्याविरूध्द जोरदार आवाज उठवला.कारण त्यांच्यासाठी तो विनाशकारी दिवस होता कोलंबसच्या पदार्पणामुळे त्यांच्या  अनेक जमाती नष्ट झाल्या होत्या.त्यांची संस्कृती नष्ट झाली होती.८० टक्के  मूळनिवासींचे हत्याकांड झाले होते.त्यांच्या या रोषाला शांत करण्यासाठी अमेरिकेने  ‘ इंडिजिनिअस पीपल्स डे  ‘ साजरा करण्याची घोषणा केली.तेव्हापासून ९ ऑगस्ट हा दिवस मूलनिवासी/आदिवासी दिवस ‘ म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. पण संख्येने कमी असले तरी अजूनही हे मूलनिवासी हा दिवस साजरा करण्याला विरोध करतात.कारण त्यांच्यासाठी हा रक्तरंजित नरसंहार दिवस आहे.

काही शतकांनंतर मूलनिवासींनी पुन्हा अन्यायाला वाचा फोडली.त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी ,२००७ साली संयुक्त राष्ट्र संघाने साळसूदपणे जाहिरनामा काढला.भारताने त्यावर सही केली .पण मूलनिवासी ही संकल्पनाच मान्य नसल्याचे भारताने स्पष्ट केले.कारण भारतातील सर्व जाती -धर्माचे ,पंथाचे लोक मूलनिवासीच आहेत.आदिवासी नाहीत.(आदिवासी म्हणजे इथले मुळचे राहाणारे व बाकीचे बाहेरून आलेले असा अर्थ होतो.भारतातील सर्व लोक मुळचे इथलेच आहेत.बाहेरून आलेले कोणीच नाहीत.म्हणून ते सर्व मूलनिवासीच आहेत.आदिवासी व इतर असा भेद नाही.)भारतीय राज्यघटनेनुसार जंगलात, वनात वास्तव्य करणार्यांेना अनुसूचित जमाती( जनजाती) संबोधले जाते.

 भारतातील परिस्थिती…                                                        

ब्रिटिशांनी आपल्या देशात इतरांप्रमाणेच या जनजातींवर सुध्दा अनन्वीत अत्याचार केले आहेत.क्रूर हत्याकांडे केली आहेत.जनजातींची १०० पेक्षा अधिक संस्थाने बुडविली.जनजातीतील अनेक क्रांतीकारकांना फाशी दिले.गोळ्या घालणे, विष देऊन मारणे,काळ्या पाण्याच्या शिक्षा देणे,सावकारांकरवी त्यांच्या जमिनी लुटणे अशा प्रकारे त्यांचा छळ केला आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत.सर्व जनजातींना भारतात सन्मानाने वागविले जाते.

 भारतातील सर्व मूलनिवासीच आहेत तरीसुध्दा भारतातील काही देशविघातक शक्ती ,गोरे लोक जनजाती व इतर समाजामध्ये फूट पाडण्यासाठी , ‘ तुम्ही मूलनिवासी/आदिवासी आहात ‘ हे त्यांना ठासून सांगण्याच्या प्रयत्नात आहेत.त्यांना ९ ऑगस्ट  हा दिवस ‘ आदिवासी दिवस साजरा करायला लावतात.तरूणांना भडकावतात.तरूणांना वाटते हा दिवस आपल्या पूर्वजांचा गौरव करण्याचा दिवस आहे.या भावनेने ते तो साजरा करतात.या तरूणांना किंवा हा दिवस साजरा करणार्यान इतर लोकांना या षड्यंत्राची कल्पनाच नाही.पण सत्य कळल्यानंतर सर्व जनजातींनी जागृत होणं आवश्यक आहे.

खरं तर आपल्या देशातील अनेक जनजातीतील क्रांतीकारकांनी देशासाठी प्राण अर्पण केले आहेत.त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे जन्मदिवस गौरव दिन म्हणून साजरे झाले पाहिजेत.याच उद्देशाने भारत सरकारने , क्रांतीकारक भगवान बिरसा मुंडांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिवस  ‘ जनजाती गौरव दिन ‘ म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे.

जनजातींचा गौरव आपल्याकडे वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.अगदी ताजं उदाहरण म्हणजे मा.श्रीमती द्रौपती मुर्मू या संथाल जनजातीतील महिलेला , भारतातील सर्वोच्च असं मानाचं राष्ट्रपती पद मिळालं आहे.हा त्यांचा गौरव तर आहेच.पण त्याचबरोबर जनजातींचाही गौरव आहे. भारत सरकारने जनजातीतील काही महिलांना ‘ पद्म ‘ पुरस्कार देऊन गौरविले आहे. उदा.लक्ष्मी कुट्टी, बीजमाता राहीबाई पोपेरे,तुलसी गौडा इ.

हा खरा मूलनिवासी जनजातींचा गौरव. ९ ऑगस्ट , ‘मूलनिवासी/आदिवासी दिन ‘ हे नुसतं थोतांड आहे. हा गौरव दिन नसून त्यांच्यासाठी संहारक दिन आहे हे,हा दिन साजरा करणाऱ्यांनी  लक्षात घेतले पाहिजे.

शोभा जोशी                                                                 

(लेखिका – जनजाती समाजाच्या शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत.)

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *