कुख्यात गुंडाचा डोक्यात दगड घालून खून : पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कुख्यात गुंडाचा डोक्यात दगड घालून खून
कुख्यात गुंडाचा डोक्यात दगड घालून खून

पुणे(प्रतिनिधि)- कुख्यात गुंड राजू शिवशरण (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) याचा मध्यरात्री किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलांनी डोक्यात दगड घालून खून केला आहे. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे दीडच्या सुमारास हडपसर मधील राम टेकडी येथील वंदे मातरम चौकात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

या खून प्रकरणी राजू शिवशरणचा भाचा निखिल कैलास चव्हाण, (रा. वंदे मातरम चौक गणपती मंदिर मागे, रामटेकडी, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर महेश शिंदे ,नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी ,दुर्गेश उर्फ बल्ल्या गायकवाड, (रा. सर्व रामटेकडी व इतर दोघेजण अनोळखी इसम) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  लग्नात हुंडा मिळेल आणि तोपर्यंत भीक मागण्यास लावता येईल म्हणून केले 3 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण : महिलेला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशरण आणि अल्पवयीन मुलांमध्ये दारूसाठी पैसे मागितल्याने वाद झाला. शिवशरण आणि मुले दारू प्यायली होती. वादातून मुलांनी शिवशरणला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलांनी शिवशरणच्या डोक्यात दगड घातला, तसेच त्याच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. गंभीर जखमी झालेल्या शिवशरणला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शिवशरण याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवशरण आणि अल्पवयीन मुले ओळखीचे आहेत. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love