भाजप नेत्याचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने खळबळ

Excitement after the body of a BJP leader was found on the railway track
Excitement after the body of a BJP leader was found on the railway track

Sunil Dhumal Dead Body : भाजपचे (bjp) युवा मोर्चाचे ( Yuva Morcha) प्रदेश संपर्क प्रमुख सुनील धुमाळ (वय ३५) (Sunil Dhumal)  यांचा मृतदेह हडपसर(Hadapsar)  जवळ रेल्वे रुळावर (Railway Line) आढळून आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. धुमाळ यांचा अपघात (Accident) झाला की त्यांनी आत्महत्या (sucide) केली याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नसून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ कुठलीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही. दरम्यान, धुमाळ यांच्या मृत्यूने हडपसर भागातील राजकीय वर्तुळात (Political Circal) खळबळ उडाली आहे. धुमाळ हे हडपसर भागातील साडेसतरा नळी येथे राहायला होते. दरम्यान, सुनील धुमाळ यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे.(Excitement after the body of a BJP leader was found on the railway track)

अधिक वाचा  मनसे ताकदीने मोहोळ यांचा प्रचार करणार : मनसे नेते अमित ठाकरे यांचा विश्वास

रेल्वे पोलिसांना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटना स्थळाला भेट दिली. तेव्हा हा मृतदेह सुनील धुमाळ(Sunil Dhumal) यांचा असल्याचे समोर आले. सुनील धुमाळ यांना रेल्वेने धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार धुमाळ हे आपल्या मुलीला दुचाकीवरून शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मुलीला शाळेत सोडल्यानंतर त्यांनी रेल्वे लाईनच्या फाटकाजवळ त्यांची दुचाकी उभी केली. शेवटचे ते रेल्वे लाईनच्या शेजारून मोबाइलवर बोलताना दिसले. दरम्यान, प्रथम दर्शनी हा अपघात वाटत असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी हा अपघात आहे की आत्महत्या असा तपास सुरू आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love