लोणावळ्यात धबधब्यातून पाच जण वाहून गेले : तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश

Succeeded in finding the bodies of all the five people who were washed away from the falls
Succeeded in finding the bodies of all the five people who were washed away from the falls

पुणे(प्रतिनिधी)- लोणावळ्यातील भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून ४  अल्पवयीन मुले व महिला पर्यटक धरणात वाहून गेले असून, यापैकी एक महिला व दोन मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले आहे. रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

नूर शाहिस्ता अन्सारी (वय अंदाजे ३५), अमिना आदिल अन्सारी (वय १३ वर्ष), मारिया अन्सारी (वय ७ वर्ष), हुमेदा अन्सारी (वय ६ वर्ष), अदनान अन्सारी (वय ४ वर्ष, सर्वजण राहणार सय्यदनगर, हडपसर, पुणे) हे पाच जण पाण्यात वाहून गेले आहेत. यापैकी नुर शहीस्ता अन्सारी व अमिणा आदिल अन्सारी, मारिया अन्सारी या तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.

अधिक वाचा  मविआ आघाडीची वज्रमुठ होणार ढिली : राज्यातील विरोधी पक्षातील या सात नेत्यांचे होणार 'भाजप इनकमिंग'... कारण ...

लोणावळा परिसरात रविवार सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठय़ा प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास धरणदेखील ओव्हर फ्लो झाले आहे. सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी पुण्याच्या हडपसर भागातील अन्सारी कुटुंब आले होते. रेल्वे विश्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱया धबधब्याच्या पाण्यातून येणाऱया प्रवाहात साधारणः १५ ते १७ जण वर्षाविहाराचा आनंद घेत असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास यामधील ४ लहान मुले पाण्यात वाहून जाऊ लागली. त्यांना वाचविण्यासाठी गेलेली एक महिलादेखील पाण्यातून थेट धरणाच्या जलाशयात वाहून गेली. सर्व जण धरणात वाहून गेल्याने सोबतच्या इतरांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. त्यावेळी काही स्थानिक युवक व धरणावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अधिक वाचा  आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येणे गरजेचे - रामदास काकडे 

 या घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळय़ातील शिवदुर्ग रेस्क्मयू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली. तिघांचे मृतदेह सापडले असून, इतरांचा शोध सुरू आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love