पुणे – टाटा स्काय या कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने टाटा स्काय म्युझिक ही आपली रीव्हॅम्प्ड म्युझिक सेवा सादर केली आहे. टाटा स्काय म्युझिक आणि टाटा स्काय म्युझिक प्लस या आधीच्या दोन पोर्टफोलिओजची ताकद एकत्र करत नव्या स्वरुपातील टाटा स्काय म्युझिकमधून परवडणाऱ्या दरात अनेक अतिरिक्त लाभांसह समृद्ध आणि संलग्न असा अनुभव दिला जाणार आहे.
20 ऑडिओ स्टेशन्स आणि 5 व्हिडीओ स्टेशन्ससह टाटा स्काय म्युझिकमध्ये सर्वसामान्यांच्या आवडीचे, खास, भारतीय, आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक, भक्तीपर, गझल, हिंदुस्थानी, कर्नाटकी संगीत अशा विविध प्रकारांचे संगीत टाटा स्काय एकत्रित उपलब्ध करून देत आहे. टीव्ही तसेच मोबाइल अॅपवर उपलब्ध ही सेवा म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी एक सुयोग्य संगीतानुभव आहे आणि तेही फक्त 2.5 रुपये दररोज या दरात.
या सेवेबद्दल बोलताना टाटा स्कायच्या चीफ कमर्शिअल अॅण्ड कंटेंट ऑफिसर पल्लवी पुरी म्हणाल्या, “आम्हाला अधिक लाभांसह एक नॉन-स्टॉप म्युझिक सेवा द्यायची होती. सर्व प्रकारच्या संगीताच्या दमदार आणि खास निवडलेल्या यादीसह नव्या स्वरुपातील टाटा स्काय म्युझिकमुळे सबस्क्राईबर्सना अधिक चांगला संगीतानुभव मिळेल. हंगामा म्युझिक या आमच्या भागीदारामुळे प्रेक्षकांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक पाऊल आहे आणि त्यातून नव्या संगीतप्रेमींपर्यंत पोहोचता येणार आहे.”
एकाच व्यासपीठावर ऑडिओ आणि व्हिडीओचा अनुभव देत टाटा स्काय म्युझिक सर्व संगीतप्रेमींना परिपूर्ण आणि सर्वसमावेशक असा परवडणाऱ्या दरातील फॅमिली प्लॅन देत आहे. टेलिव्हिजन आणि टाटा स्काय मोबाइल अॅप अशा दोन्ही ठिकाणी कधीही, कुठेही हा आनंद घेता येईल. या सेवेच्या अॅक्टिव्ह सबस्क्राईबर्सना यापुढेही टाटा स्काय मोबाइल अॅपच्या माध्यमातून हंगामा म्युझिक प्रो सबस्क्रिप्शन या दरमहा 99 रुपयांच्या प्लॅनचा आनंद कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळवता येईल.
टाटा स्काय म्युझिक आणि म्युझिक+ या सेवांच्या अॅक्टिव्ह सबस्क्राईबर्सना आपोआपच या प्लॅनमध्ये अपग्रेड केले जाईल. नव्या सबस्क्राईबर्सना 080 6858 0815 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन 815 वरील या सेवेचा आनंद घेता येईल.