पुणे ‘पदवीधर’ निवडणूक:भाजप गड राखणार का?

पुणे—पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्याने या निवडणुकीला अधिक महत्व आले आहे. या मतदार संघातून दोनदा आमदार झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभेच्या निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आमदार झाले असले तरी त्यांच्यावर हा गड राखण्याची जबाबदारी अधिक आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या आणि चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने […]

Read More

खडसे यांना आमदार करू नका – अंजली दमानियांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई- राष्ट्रवादीमध्ये नुकताच प्रवेश केलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून विधान परिषदेसाठी खडसे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा असतानाच अंजली दमानिया यांनी थेट राज्यपालांना पत्र दिले आहे. खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे असलेले आरोप आणि त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्यावेळी वापरलेली भाषा […]

Read More

हिम्मत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसने स्वतंत्र लढावं -चंद्रकांत पाटील

पुणे – हिम्मत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी कोंग्रेस आयन कॉँग्रेसने स्वतंत्र लढावं असं आव्हान देत आणखी पाच वर्षे सरकार चालवलं तर प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची ताकद आहे असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.पाटील म्हणाले, आमची सर्व गोष्टींची तयारी आहे, पण तुमच्यातच हिम्मत नाही. […]

Read More

चंद्रकांत पाटील म्हणतात ‘रात गयी, बात गयी’

पुणे-एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना लिमलेटची गोळी मिळती की कॅडबरी हे पहावं लागेल असं वक्तव्य केले होते. त्यानंतर पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता. खडसे यांनी चंद्रकांत पाटील कुल्फी आणि चॉकलेटसाठी भाजपमध्ये आले अशी खोचक टीका केली होती. त्यावरून आता दोघांमध्ये कलगीतुरा रंगणार असं वाटलं […]

Read More

पाटलांची लिमलेटची गोळी – कॅडबरी आणि खडसेंचे कुल्फी-चॉकलेट काय आहे भानगड?

मुंबई- एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे आता अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एकनाथ यांच्यातील कलगीतुरा आता रंगू लागल आहे. नाथा भाऊंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत व्यक्त केल्यानंतर खडसे यांनी ‘तुम्ही […]

Read More

त्यांनी ‘इडी’ लावली तर मी ‘सीडी’ लावेन: कोणाला म्हणाले खडसे असे?

मुंबई—खान्देशातील भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. आपल्या डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखे वाटतं असे सांगतानाच त्यांनी ‘इडी’ लावली तर मी ‘सीडी’ लावेन असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केले. कोणी किती भूखंड घेतले? यांचे लवकरच पत्ते खोलणार असल्याचे ते म्हणाले. […]

Read More