ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात संजीवन समाधी सोहळा संपन्न : चार लाख वैष्णवजणांचा आळंदीत हरिनामाचा गजर

आळंदी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने मंगळवारी संपन्न झाला. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे चार लाख भाविक आळंदीत दाखल झाले होते. निर्बंधमुक्त हा सोहळा पार पडत असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण होते असे आनंदी देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. अलंकापुरीमध्ये गुरुवारपासून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा रंगला. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात […]

Read More

माऊलींच्या पालखी सोहळ्याने विठुनामाच्या बळावर दिवे घाटाची अवघड व नागमोडी वळणे लीलया केली पार

पुणे— विठ्ठल भक्तीने भिजला दिवे घाट । जाहली सोपी वाट । पंढरीची ।। दिंडय़ादिंडय़ातून होणारा विठुनामाचा घोष…अन् टाळ-मृदंगाचा झंकार…….अशा अत्यंत भारावलेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ाने विठुनामाच्या बळावर नयनरम्य दिवे घाटाची अवघड व नागमोडी वळणे शुक्रवारी लीलया पार केली…आणि सायंकाळी माउलींची पालखी संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत विसावली. संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दोन […]

Read More

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे २१ जूनला पंढरीकडे प्रस्थान

पुणे–देहू संस्थानने आषाढी वारीची घोषणा केली आहे. यानुसार संत तुकाराम महाराजांची पालखी २० जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. यंदा पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असणार आहे. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये पोहचणार असून १० जुलैला आषाढी एकादशी आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे. […]

Read More

भक्तीची शक्ती जागविणारे संत शिरोमणी नामदेव महाराज

संत ज्ञानेश्वरांनी पाया रचलेल्या भागवत धर्माच्या विस्ताराचे मोलाचे काम करणारे संत नामदेव हे संतांच्या मांदियाळीत अतिशय महत्वाचे आहेत. तत्कालीन परिस्थितीत केवळ मराठी मुलुखातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, गुजरात,मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, हरियाणा,उत्तरांचल,हिमाचल प्रदेश अशा इतर प्रांतातही भक्तीच्या प्रसाराचे कार्य करणे; दया,क्षमा,शांतीचे शिक्षण देणे ,जातीधर्माच्या भिंती ओलांडून समाजपरिवर्तन व प्रबोधन करणे हे अलौकिक कार्य त्यांनी केलेले दिसून […]

Read More