जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना महापालिकेचा दणका: रुग्णांना दिले सव्वातीन कोटी रुपये परत मिळवून

पुणे- कोरोना बाधा झाल्यानंतर रुग्णांना आणि कुटुंबीयांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते. दुसरीकडे या भीतीचा गैरफायदा रुग्णालये घेत असल्याचे चित्र सर्व ठिकाणी दिसते आहे. अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी करून कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट करायची हे सर्रास सुरू असून अशा लूट करणाऱ्या पुण्यातील रुग्णालयांना पुणे महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट करून […]

Read More

नाशिकच्या दुर्घटनेवरून पुणे महापालिका झाली खडबडून जागी: शहरातील रुग्णालयांमधील ऑक्सीजन यंत्रणेची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश

पुणे- नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये बुधवारी (दि. 21 एप्रिल) ऑक्सीजनची गळती झाली आणि त्यामुळे ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्याने तब्बल 24 जणांचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला. राज्यभर कोरोनाचा उद्रेक झाला असताना या घटनेने व्यवस्था आणि यंत्रणेची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. या घटनेचा धसका घेत पुणे महापालिका खडबडून जागी  झाली आहे. पुणे शहरातील सर्व खासगी, […]

Read More

रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा दोन दिवसांत सुरळीत होईल – विक्रम कुमार

पुणे– कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन पुणे महापालिकेची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पुढील काळात रुग्णांसाठी खाटा कमी पडू देणार नाही असा विश्वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा दोन दिवसांत सुरळीत होईल, तुटवडा जाणवणार नाही असेही त्यांनी नमूद केले. फेब्रुवारी महीन्यापासून पुणे शहरांत कोरोनाची […]

Read More

आता कॉल सेंटरवर कोरोना संदर्भातील माहिती २४ तास मिळणार – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे–कोरोना संसर्ग वाढत असताना रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी बेड्स उपलब्धतेची माहिती मिळावी यासाठी कॉल सेंटरचे विस्तारीकरण केले असून आता कॉल सेंटरवर कोरोना संदर्भातील माहिती २४ तास मिळणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होणे सोपे व्हावे, या अनुषंगाने कोरोना कॉल सेंटरचा आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या […]

Read More

मुंढवा केशवनगर भागाला कोणी वाली आहे का ? -नंदाताई जाधव

पुणे- पुणे महानगर पालिकेत मुंढवा केशवनगर हा भाग समाविष्ट होऊन तीन वर्षे उलटली आहेत. परंतु, येथील मांजरी रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून पुणे महानगरपालिका केवळ जनतेकडून कर रूपाने गोळा करीत असल्याचा आरोप करत मुंढवा केशवनगर भागाला कोणी वाली आहे का ? असा सवाल दामीनी बहुउद्देशीय महीला संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. नंदाताई जाधव यांनी केला […]

Read More

सांगली महापालिकेतील झटक्यानंतर भाजप पुण्यात सावध : नगरसेवकांसाठी काढला ‘व्हिप’

पुणे : सांगली महापालिकेत बसलेल्या झटकयानंतर भाजप आता पुणे महापालिकेतील महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीसाठी सावध झाला आहे. या निवडणुकीसाठी काही दगाफटका आपल्याच नगरसेवकांकडून होऊ नये म्हणून पक्षाकडून ‘व्हिप’ जारी करण्यात आला आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं आहे. […]

Read More