खडसेंचे वकील अ‌ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात येणार ईडीचे अधिकारी

पुणे—भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणी पुण्यातील अ‌ॅड. असीम सरोदे यांच्याकडे खडसे यांचे वकीलपत्र आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे ईडीचे समन्स मिळाले होते. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीकडून नोटीस बजावण्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर, एकनाथ खडसेंच्या केससंदर्भातील कागदपत्रांचा तपास […]

Read More

ईडीमार्फत नोटिसा पाठवायच्या हेच भाजपचे सध्याचे धोरण : जयंत पाटील

पुणे–केंद्र सरकारविरोधात जे बोलतात, त्यांना ईडीमार्फत नोटिसा पाठवायच्या आणि उपद्रव वा जाणीवपूर्वक त्रास द्यायचा, हेच भाजपाचे सध्याचे धोरण असल्याची टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथे केली. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी पाटील पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री एकनाथ खडसे व खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठविल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना […]

Read More

फडणविसांनी मला खूप छळलं -पक्षत्याग केल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया

जळगाव –अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर पहिली प्रतिक्रिएकनाथ या देताना विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून केवळ त्यांच्यामुळेच पक्षत्याग केल्याचे जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. गेल्या 40 वर्षांत भाजप जिथे नाही त्याठिकाणी पोहचवला. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मला खूप छळल, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा […]

Read More

नाथाभाऊ कुठेही जाणार नाही-चंद्रकांत पाटील

पुणे – एखादी व्यक्ती नाराज होणे पुन्हा नॉर्मल होणे ही एक सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. एकदा नॉर्मल झाल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा नाराज होणार नाही असे कधीच नसतं. त्यामुळे भाजपचे नेते एकनाथ आता जरी नाराज असले तरी त्यांच्याबरोबर बोलणं सुरु आहे. त्यांची नाराजी दूर होईल आणि पुन्हा ते आमच्या सर्वांचं नेतृत्व करतील असे सांगत नाथाभाऊ कुठेही […]

Read More

खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश:बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात

मुंबई- घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, त्यांना विधान परिषदेतून आमदारकी देऊन कृषी खाते देणार अशा प्रकारची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सुत्रांकडूनही अशी माहिती मिळाली होती. मात्र, खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ ठरला आहे. खडसे यांना पक्षात डावलले जात असल्यामुळे त्यांनीच अनेकवेळा नाराजी व्यक्त केली होती. […]

Read More