स्वामी अग्निवेश यांचे दिल्लीत निधन


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रसिध्द असलेले आर्य समाजाचे प्रसिध्द नेते आणि हरियानाचे माजी शिक्षणमंत्री स्वामी अग्निवेश (वय ८०) यांचे आज यांचे दिल्लीतील लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेस इंस्टिट्यूटमध्ये शुक्रवारी ६.३० वा. निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून लिवर सिरोसिसने ग्रस्त होते.

स्वामी अग्निवेश यांनी राष्ट्रीय वेठबिगार मुक्ती मोर्चा संघटनेद्वारे देशभर वेठबिगारांच्या मुक्ततेसाठी भरीव कार्य केले असून त्यांनी १९७० साली आर्य सभा नावाचा राजकीय पक्षही स्थापन केला होता. १९७७ मध्ये ते हरियाणा विधान सभेवर निवडून आले व शिक्षण मंत्रीही झाले.

अण्णा हजारे यांच्या २०११ मधील आंदोलनात स्वामीजींनी सहभाग घेतला तसेच ‘बिग बॉस’ या बहुचर्चित टेलीव्हिजन शो मध्येही त्यांचा सहभाग राहिला. ते कोणत्याही विषयावर स्पष्ट मत मांडत असत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा म्हणजे चांगले काम थांबवण्याचा कट : अरविंद केजरीवाल