यंदा द्राक्षाचं भरघोस उत्पादन :४२ द्राक्ष बागायतदारांची निर्यातीसाठी नोंदणी


पुणे- गेल्या आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम द्राक्ष शेतीवर झाला नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांन दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यंदा द्राक्षाचे भरघोस उत्पादन होणार असून राज्यातून ४२ द्राक्ष बागायतदारांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

ढगाळ वातावरणामुळे यंदा द्राक्ष उत्पादकांना फटका बसेल चिन्ह होती मात्र, त्याचा द्राक्षावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं राज्य फलोत्पादन विभागानं स्पष्ट केलंय आहे.  उलट यंदा राज्यात द्राक्षांच उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार असून  द्राक्ष निर्यातीसाठी राज्यातून 42 द्राक्ष बागायतदारांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 35 हजार 260 बागा.या एकट्या नाशिक जिल्ह्यातील आहेत, द्राक्षाचा हंगाम फेब्रुवारी ते मार्च असा आहे, मात्र यंदा देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या 30 लाख टन द्राक्षांची मात्रा चांगली सुधारली असल्याची माहिती पुण्यातील भारतीय अनुसंधान केंद्रातील द्राक्ष संशोधन विभागानं दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ट्रस्ट - चंद्रकांत पाटील