पिंपरी(प्रतिनिधि)–चिंचवडच्या थरमॅक्स चौकातील स्टेप अकॅडमीने आपली 11 वर्षाची 100 टक्के यशाची परंपरा कायम राखत बारावीच्या परीक्षेत यंदाही दैदिप्यमान यश मिळविले. स्टेप अकॅडमीच्या अनुष्का जगताप ही 92 टक्के गुण मिळवत प्रथम आली. तन्वी गायकवाड हिने 90 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तर यश सागावकर याने 83.67 टक्के गुण घेत तृतीय, आकांक्षा जाधव हिने 83 टक्के गुण मिळवत चौथा, तर स्वयम बरे याने 82.67 टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला. यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे 35 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्याहून अधिक गुण मिळवित यशाचे शिखर गाठले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अकॅडमीच्या संचालक मंडळाने आनंद व्यक्त करीत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अकॅडमीच्या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, नेमक्या नोट्स, विद्यार्थ्यांचे कष्ट, परीक्षेच्या दृष्टीने करून घेतलेली तयारी यामुळे हे यश मिळाले असल्याचे अकॅडमीचे संस्थापक प्रा. संदेश मुखेडकर यांनी सांगितले.
मुख्य पृष्ठ पुणे-मुंबई स्टेप अकॅडमीची 100 टक्के यशाची परंपरा कायम :तब्बल 35 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्याहून...