तर आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता- जयंत पाटील


पुणे -खासदार सुजय विखे यांचे रेमडेसिविर इंजेक्शनच्या वादग्रस्त खरेदीबाबत राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटू लागले आहेत. आम्हाला आधी कळालं असतं तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील  यांचाच नंबर दिला असता, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.  दरम्यान, लोकप्रतिनिधी इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यात अडथळे  निर्माण होतील असेही ते म्हणाले.

पुण्यामध्ये पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, हा प्रकार अतिश्य गंभीर आहे. औरंगाबाद उच्च न्यायालायने सुजय विखेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत . आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही रेमडेविसिरची गरज असलेले रुग्ण आणि डॉक्टरांना सुजय विखेंचा नंबर दिला असता. मात्र, अशाप्रकारे राजकीय हेतूने काम करणे योग्य नाही, असे जयंत पाटील म्हणाले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  आरक्षण संपविणे, हीच काँग्रेसची मानसिकता : अनुराग ठाकूर यांचा आरोप