सिल्व्हर लेक करणार रिलायन्स रिटेलमध्ये 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक


मुंबई- जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यानंतर सिल्व्हर लेक आता रिलायन्स रिटेलमध्येही गुंतवणूक करीत आहे.  अमेरिकी इक्विटी फर्म सिल्व्हर लेक 1.75 टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्स रिटेलने केली  आहे. या करारात रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मूल्य अंदाजे 4.21 लाख कोटी रुपये आहे.

जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सुमारे दीड लाखाच्या गुंतवणुकीचे लक्ष्य गाठल्यानंतर आता उद्योजक मुकेश अंबानी रिटेल आर्म रिलायन्समध्ये विदेशी गुंतवणुकीचे सत्र सुरू करण्याच्या तयारीत आहेत.  

 सिल्व्हर लेक हे जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठे गुंतवणूकदार मानले जाते. रिलायन्स रिटेलमध्ये सिल्व्हर लेकच्या गुंतवणुकीवरून हे स्पष्ट झाले आहे की रिलायन्स रिटेल भारतीय रिटेल क्षेत्रातील एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आला आहे. अलीकडेच रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुप ताब्यात घेतला.

अधिक वाचा  नियोने नियोएक्स सुरु करण्यासाठी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेसोबत केली भागीदारी

सिल्व्हर लेकने यापूर्वी जिओ प्लॅटफॉर्मवर 1.35 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 10200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायन्स रिटेल आणि जिओ प्लॅटफॉर्मचे एकूण मूल्यांकन 9 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये पसरलेल्या 12 हजाराहून अधिक स्टोअरमध्ये वर्षाकाठी रिलायन्स रिटेलचा दर वर्षाला 64 कोटीं फूटफॉल आहे. रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांनी 3 कोटी किराणा दुकान आणि 120 दशलक्ष शेतकर्‍यांना या नेटवर्कद्वारे जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. किराणा क्षेत्रातील जियोमार्ट या ऑनलाइन स्टोअर कंपनीने नुकतीच  ऑनलाईन बाजारात पदार्पण केले आहे. जिओमार्टवर दररोज सुमारे 4 लाख ऑर्डर बुक होत आहेत.

सिल्व्हर लेकच्या कराराबद्दल आनंद व्यक्त करताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, “कोट्यावधी छोटे व्यापारी आपल्या गुंतवणूकीतून भागीदारी करण्याच्या आमच्या परिवर्तनीय कल्पनेत सिल्व्हर लेकशी जोडले गेले आहेत याचा आम्हाला आनंद होत आहे.भारतीय रिटेल क्षेत्रातील भारतीय ग्राहकांना मूल्य आधारित सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला विश्वास आहे की रिटेल क्षेत्रात आवश्यक बदल घडवून आणण्यात तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरेल आणि रिटेल इको सिस्टमशी संबंधित सर्व घटक अधिक चांगले विकास प्लॅटफॉर्म तयार करण्यास सक्षम असतील. भारतीय रिटेल क्षेत्रातील आमची  दूर दृष्टी वाढविण्यासाठी सिल्व्हर लेक महत्त्वपूर्ण भागीदार ठरेल ”

अधिक वाचा  #Budget : वार्षिकअर्थसंकल्प : अर्थसंकल्प मांडणी २८ ऐवजी १ फेब्रुवारीला का?

या गुंतवणूकीवर भाष्य करताना, सिल्व्हर लेकचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय भागीदार श्री. एजॉन डर्बन म्हणाले, “मुकेश अंबानी आणि रिलायन्सच्या टीमने त्यांच्या प्रयत्नांद्वारे रिटेल व तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व मिळवले आहे. इतक्या कमी वेळात जिओमार्टने मिळविलेले यश, खासकरुन जेव्हा कोविड -19 साथीच्या काळात भारत इतर जगाशी लढत होता ते खरोखरच अभूतपूर्व आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love