विनामास्क फिरणाऱ्या आमदाराकडून केला ५०० रुपये दंड वसूल,कोण आहेत हे आमदार?

क्राईम राजकारण
Spread the love

पुणेपुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.  या प्रादुर्भाव वाढीसाठी नागरिकांची बेशिस्तही कारणीभूत ठरत आहे. मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुण्यात आहे. आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे. गेल्या आठवड्यात पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमधील व्यवस्थेचे आणि गलथान कारभार बिंग बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनीही मास्क न लावणाऱ्यांना दंड करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आणि पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विना मास्क फिरणाऱ्या सुमारे २० हजार नागरिकांवर कारवाई करीत दंड वसूल केला आहे. मात्र, आता केवळ नागरिकच नाही तर लोकप्रतिनिधीही बेजबाबदारपाने वागत असल्याचे समोर आले आहे. आज पुण्यामध्ये नांदेडचे आमदार अमरनाथ अनंतराव राजूरकर हे आपल्या आलिशान मोटारीतून आपल्या चार मित्रांसह विनामास्क जात असताना पोलिसांनी व पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारून त्यांच्याकडून ५०० रुपये दंड वसूल केला आहे. अमरनाथ राजूरकर हे नांदेडचे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत

 याबाबत माहिती अशी, गुरुवारी सकाळी साडेअकरावाजण्याच्या सुमारास पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी तसेच कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शास्त्रीनगर चौकामध्ये कारवाई करत होते. त्यावेळी राजूरकर आपल्या  आलिशान मोटारीमधून (एमच २६, बीआर ५९९९) चौघे विनामास्क जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वाहन चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु, वाहन चालकाने गाडी थांबली नाही. तो तसाच भरधाव पुढे निघाला. गाडीतील सर्व विनामास्क असल्याने पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर गाडी अडविली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चालकाला तुम्ही सर्व विनामास्क फिरत असल्याने दंडाची पावती करावी लागेल असे सांगितले. त्यावर चालकाने हुज्जत घालत गाडीमध्ये आमदार बसले आहेत; त्यांची तुम्ही पावती करणार का असा प्रश्न केला. त्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा नियम राज्य शासनाने केलेला असून सर्वसामान्य नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना नियम सारखेच आहेत असे सांगितले.

त्यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी तुम्हाला बघून घेईल असे धमकावले. त्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपण आमदार असला तरी आपल्याला कोरोना होणार नाही का? कोरोना कोणालाही होवू शकतो, आपण मास्क लावला पाहिजे असे नम्रपणे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदारांनी त्यावर मी मास्क लावणार नाही असे धमकावण्याचा प्रयत्न केला परंतु पालिका अधिकाऱ्यांनी न डगमगता आमदारांची ५०० रुपयांची पावती करून दंड वसूल केला आणि मग गाडी सोडली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *