अयोध्येत एक हजार वर्षे टिकेल असे श्रीराम मंदिर उभारणार -स्वामी गोविंद देव गिरी महाराज

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे –आयोध्येमध्ये एक हजार वर्षे टिकेल, असे श्रीरामाचे मंदिर उभारण्यात येणार असून त्यासाठी साधारण 1100 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी दिली. दरम्यान,अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी सर्वसामान्य नागरिकांचा हातभार लागावा यासाठी देशभरातील नागरिकांकडून निधी गोळा करण्यात येणार आहे. मकरसंक्रांती पासून म्हणजेच 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत हा निधी गोळा केला जाणार आहे. यासाठी देशभरात दीड लाख स्वयंसेवक जनतेशी संपर्क करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर, रा.स्व. संघ प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे, प्रांत अभियान सहप्रमुख मिलींद देशपांडे, पूणे महानगर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर उपस्थित होते .

मंदिराच्या ठिकाणी 200 फुटांपर्यंत फक्त रेती असून त्याठिकाणी हजार वर्ष टिकेल असं मंदिर उभारण्याचे याआधी प्रयत्न झाले पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पण आता मुंबई, गुवाहाटी, हैदराबाद येथील आयआयटी संस्थांच्या मदतीने तज्ञांची एक समिती नेमली असून त्यांनी दोन पर्याय दिले आहेत. त्यातील कोणता पर्याय निवडावा यासाठी दोन दिवस बैठक पार पडली. दगडांच्या आधारे हे मंदिर उभं राहील आणि हजार वर्ष टिकेल,” स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी स्पष्ट केले.

गोविंद गिरी महाराज म्हणाले,अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी सर्वसामान्य नागरिकांचा हातभार लागावा यासाठी देशभरातील नागरिकांकडून निधी गोळा करण्यात येणार आहे. मकरसंक्रांती पासून म्हणजेच 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत हा निधी गोळा केला जाणार आहे. यासाठी देशभरात दीड लाख स्वयंसेवक काम करणार आहेत. देशातील चार लाख गावातील 11 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे नियोजन या अभिनमार्फत करण्यात आले आहे. यासाठी 1000, 100 आणि 10 रुपयांचे कुपन तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून हा निधी गोळा केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील 45 हजार गावांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन

कलन समर्पण अभियानाद्वारे महाराष्ट्रातील 45 हजार गावातील अडीच कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गावातील कुटुंबापर्यंत पोहोचून हा निधी संकलन करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असल्याचे गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले.

मंदिराचा सर्व खर्च उचलण्याची एका उद्योगपतीची तयारी..पण..

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी हातभार लागावा यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. राम मंदिराच्या बांधकामासाठी जो अंदाजे 1100 कोटींचा खर्च येणार आहे, तो संपूर्ण खर्च करण्याची तयारी एका उद्योगपतीने दर्शवली आहे. मात्र, मी त्यांचं नावही विचारलं नाही. नाव लावायचं आहे की नाही याची चौकशीही केली नाही. नाव लावायचं असेल तर प्रश्नच मिटला आणि लावायचं नसेल तर काही भाग तुम्ही देऊ शकता असं मी त्यांना सांगितलं. सामान्यातील सामन्यांचा निधी श्रीराम मंदिर उभारणीसाठी लागला पाहिजे अशी आमची भूमिका आहे,” अशी माहिती गोविंद देवगिरी महाराज यांनी यावेळी स्पष्ट केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *